Gujrat Assembly Election 2022 : मतदान सुरु असतानाच धक्कादायक प्रकार समोर

योगेश खरे, झी मीडिया, गुजरात: सध्या गुजरात विधानसभा (gujrat vidhansabha) निवडणूकांना जोर आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणाला (gujrat elections 2022) उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये एकूण 290 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 2017 मध्ये केवळ 27 कोटी रुपये पकडण्यात आले होते त्यामुळे रोख रकमेच्या गैरव्यवहारांमध्ये (crime news) दहापट वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचबरोबर अमली पदार्थ आणि बेकायदेशीर असलेली दारू सुद्धा मोठ्या प्रमाणात पकडण्यात आली आहे, विशेष म्हणजे याच काळात एमडी ड्रग्स बनवणारा कारखाना उद्धवस्त करण्यात आला आहे. यामध्ये 478 करोड रुपयांचा एमडी डग आढळून आल्याने गुजरात अमली पदार्थांचे प्रमुख केंद्र बनते की काय अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. (90 crore rupees seized in Gujarat assembly elections says report)

हेही वाचा :  कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार

मराठी मतदारांचा मतदारसंघ लिंबायत मतदार संघ

महाराष्ट्रातील खानदेशाला लागून असलेला सुरत हा जिल्हा बहुतांशी मराठी लोकांनी व्यापला आहे यातील लिंबायत मतदार संघात दीड लाख खानदेशी मराठी मतदार असल्याने आमदारकीसाठी उमेदवारी मराठी देण्यात आले आहेत इथे सध्या भाजपच्या उमेदवार संगीता पाटील आणि आमचे उमेदवार रवींद्र तायडे यांच्यामध्ये लढत आहे गेल्या दोन टर्म पासून आमदार असलेल्या संगीता पाटील यांच्यापुढे काँग्रेस आणि आपचे दमदार आव्हान आहे

मोरबी दुर्घटना ठरणार पहिल्या टप्प्यातील मतदानाचा कळीचा मुद्दा

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मोरबी ची दुर्घटना कळीचा मुद्दा ठरणारे. मुर्बीतील तरंगता पूल कोसळल्याने 135 जणांचा मृत्यू झाला होता. या मयताच्या कुटुंबांमध्ये रोज काबीज करण्यासाठी त्याच वेळी आप मैदानात उतरली होती. सौराष्ट्रातील अविकसित असलेला औद्योगिक परिसर आणि तेथील मतदारांची राजकीय वैचारिक क्षमता बघता भाजपसाठी गेल्या वेळेची 48 आमदार राखणे आव्हानात्मक ठरले आहे. 

सौराष्ट्र कच्छ आणि दक्षिण गुजरात मधील पहिल्या टप्प्यातील मतदानाची राजकीय परिस्थिती

गुजरात राज्यातील 89 जागांपैकी 32 जागा या पाटीदार समाजाच्या आहेत. गेल्या वेळी काँग्रेसला पोषक असलेल्या याच भागात भाजपाच्या 15 जागा 2012 पेक्षा कमी झाल्याने यावेळी भाजपाने कंबर कसलीय . दक्षिण गुजरात मध्ये आपने चांगलीच मुसंडी मारलीये. सुरत मध्ये 28% मते केजरीवाल यांच्या अपक्षाने मिळवत 26 उमेदवार विजयी केलेयत. सुरत मध्ये बहुतांशी मतदार हा परप्रांतीय असल्याने तसेच सौराष्ट्र भागातील स्थलांतरित मजूर असल्याने सुरतच्या राजकारणाचा प्रभाव हा पहिल्या टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरतोय. तसेच काँग्रेसने सलग तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये आपली आमदारांची वाढती घोउडदौड कायम ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार केल्याने पहिल्या टप्प्यातील निवडणूक त्रिकोणी ठरणार आहे. 

हेही वाचा :  Gold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

गुजरातच्या मतदानात आज ठरणार आजच्या भावी मुख्यमंत्र्यांचे तर गुजरातच्या दहा मंत्र्यनचे भवितव्य

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभलिया येथून लढत आहेत. तर मुख्यमंत्री भूपेश पटेल यांच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांचे भवितव्य आज ठरणारे.गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदार असलेले कुंवरजी बावलिया, मोरबीचे ”हिरो” कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांचे भविष्य आज मतदान पेटी मध्ये बंद होणार आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान 2 तासात 10 टक्के मतदान

गुजरात विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 788 उमेदवार 89 मतदार संघामध्ये आपलं भवितव्य आजमावतायेत. यासाठी एकूण 14,382 मतदान केंद्र तयार करण्यात आलीहेत. एकूण चार कोटी 91 लाख मतदारपैकी 19 जिलहायतील 2 कोटी 39 लाख मतदार आज मतदान करणारेत.या पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख वीस हजार कर्मचारी निवडणुकीसाठी जिंकण्यात आले आहे एकूण 38 हजार 749 ईव्हीएम युनिट लावण्यात आले असून 78 हजार 985 पोलिंग ऑफिसर निवडणूक पार पाडत आहेत मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी होण्यापेक्षा होतं मात्र तशी गर्दी झालेली दिसून येत नाही त्यामुळे दोन तासात केवळ दहा टक्के मतदान झालं आहे 

हेही वाचा :  ऑनलाईन गेमिंगमुळे मुलगा कर्जबाजारी, इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी जन्मदात्या आईची हत्या

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला मोठ्या प्रमाणात गर्दी

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आज सकाळपासून मतदारांचा जाणवणारा निरुत्साह आता दहा वाजेनंतर गर्दीच्या रूपाने बाहेर पडला आहे ठिकठिकाणीच्या मतदारा केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. 

गुजरातमध्ये आप देतेय भाजपसह सर्वच पक्षांना टक्कर, काँग्रेस संपण्याच्या मार्गवर?

गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यामध्ये 75 लाखाच्या लोकसंख्येमध्ये सात लाख लोक मराठी आहेत. त्यामुळे सुरतच्या निवडणुकीत मराठी टक्का महत्त्वपूर्ण आहे याच मराठी टक्क्याचा हात धरून हात हळूहळू गुजरात मध्ये वृद्धिंगत होतेय. 

शिवसेनेचा मराठी कार्यकर्ता उभारतोय गुजरातमध्ये आप पक्षाचा पाया

गुजरात मध्ये सुरत महापालिका निवडणुकांमध्ये 69 नगरसेवक आणण्याची किमया खानदेशी मराठी माणसाने केली आहे कधीकाळी सेनेचा बालेकिल्ला सांभाळणारे विलास पाटील आता आप पक्षाचे नेतृत्व करता आहेत. 

गुजरात विधानसभेसाठी 19 जिल्ह्यात एक वाजेपर्यंत 34.45% मतदान

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण 19 जिल्ह्यांमध्ये 34.48% मतदान झाले आहे एकूण 89 मतदार संघासाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये 788 उमेदवार आपले मत आजमावत आहेत दक्षिण गुजरात सौराष्ट्र आणि कच्छ या भागामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. गर्दीचा ओघ बघता यावेळी मतदानाचा टक्का 75% च्या वर जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान कुठलाही गंभीर अनुचित प्रकार अद्याप या निवडणुकांमध्ये नोंदवण्यात आलेलं नाही.   



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …