Goodbye 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Swiggy हे भारतातील लोकप्रिय फूड डिलीव्हरी  प्लॅटफॉर्म (Food delivery platform) आहे. स्विगीने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये 2022 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त काय ऑर्डर केले आहे हे सांगितले आहे. स्वीगीच्या अहवालनुसार, बिर्याणी यावर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डर देऊन नवा विक्रम केल्याचे या अहवालात समोर आले आहे. यंदा दर मिनिटाला बिर्याणीच्या 137 ऑर्डर होत्या. 

swiggy वर सर्वाधिक ऑर्डर केलेली यादी

swiggyच्या अहवालानुसार, चिकन बिर्याणी, मसाला डोसा, चिकन फ्राईड राईस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्रायड राइस, व्हेज बिर्याणी आणि तंदूरी चिकनची ऑर्डर दिली गेली. स्विगीच्या नवीन अहवालात असेही दिसून आले आहे की, लोक एक्सपेरिमेंटच्या मूडमध्ये होते. भारतीय खाद्यपदार्थांव्यतिरिक्त लोकांनी इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल, मसालेदार रामेन आणि सुशी देखील ऑर्डर केली. याशिवाय अनेक पदार्थ भारतीयांनी चाखले. 

स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेले स्नॅक्स

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समोसेला खूप मागणी होती. एकूण 4 दशलक्ष ऑर्डर्ससह समोसा यावर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या स्नॅक्सच्या यादीत अव्वल आहे. समोसाशिवाय पॉपकॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टिक्स, हॉट विंग्स, टॅको, क्लासिक स्टफ्ड गार्लिक ब्रेड आणि मिंगल्स बकेट टॉपवर आहेत. मिठाईमध्ये गुलाब जामुन अव्वल ठरला.

हेही वाचा :  'हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे' म्हणत कोर्टाकडून 'या' मंदिरात गैरहिंदूंना 'नो एन्ट्री'

मिठाईत गुलाब जामुन अव्वल  

मिठाईच्या यादीत गुलाब जामुन अव्वल स्थानावर आहे. 2.7 दशलक्ष ऑर्डरसह गुलाब जामुन, 1.6 दशलक्ष ऑर्डरसह रसमलाई, 1 दशलक्ष ऑर्डरसह चोको लावा केक, रसगुल्ला, चोकोचिप्स आइस्क्रीम, अल्फोन्सो मॅंगो आइस्क्रीम, काजू कटली, टेंडर कोकोनट आइस्क्रीम सर्वाधिक ऑर्डर केले गेले. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …