Gold Rate : सोने-चांदी खरेदीकरांसाठी मोठी बातमी, आजच खरेदीवर होईल इतकी बचत!

Gold Silver Price on 28 May 2023 : मे 2023 मध्ये सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price) विक्रमी उच्चांकीनंतर दोन्ही मौल्यवान धातूंचे दर गेल्या काही दिवसांपासून पडझड सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असताना, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातच होत आहे. आठवडाभरात सलग चौथ्या दिवशी चांदीच्या भावात घसरण झाली आणि प्रतिकिलोचा भाव 71 हजार रुपये आणि सोन्याचा वायदा आज 60 हजार रुपयांवर खाली आला. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात घसरण नोंदवण्यात आली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे MCX वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या दराक 110 रुपयांची घसरन झाली असून 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 55,550 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला प्रति दहा ग्रॅमसाठी 60,600 रुपये मोजावे लागतील. 

वाचा: विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, काय आहेत आजचे दर?

तर दुसरीकडे जागतिक बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज तुम्हाला 1 किलो चांदी (silver rate) खरेदी करण्यासाठी 73,000 रुपये मोजावे लागतील. काल (27 मे 2023) चांदीची किंमत 72,900 रुपये होती म्हणजेच आजची किंमत 100 रुपयांनी वाढली आहे.

हेही वाचा :  Gold Silver Rates: सोनं-चांदीच्या दरात आजही घसरण कायम, लग्नसराईसाठी खरेदीची सुवर्णसंधी

जागतिक बाजारात सोने-चांदीवर उच्चांक

डॉलर निर्देशांकात जोरदार वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. सोन्याची किंमत $1957 प्रति औंस आणि चांदीची किंमत $23.12 प्रति औंस झाली आहे. दरम्यान, आज डॉलरचा निर्देशांक 103 च्या पुढे गेला असून, हा अडीच महिन्यांतील उच्चांक आहे.

एका मिस्डकॉलवर जाणून घ्या आजचे दर

जर तुम्ही 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी केले तर तुम्हाला एका मिस कॉलरची किंमत मिळू शकते. यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर लवकरच एसएमएस येईल. त्या आधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच, किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या इतर ठिकाणांहून माहिती घेऊ शकता.

BIS केअर अॅप

तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाउनलोड करा. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हे BIS अॅप मिळवू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित केला जातो. हा नंबर टाईप केल्यावर, हॉलमार्किंगचा संपूर्ण तपशील दिसेल आणि शेवटी, किती कॅरेट सोने आहे. 

हेही वाचा :  गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरी अजितदादांच्या भेटीला; पत्रकारांनी विचारलं राजकीय गुरु कोण? स्पष्टचं म्हणाले...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले ‘आम्ही निवडणुकांवर…’

LokSabha Election: देशातील निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवरच (EVM) होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. …

RBIची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही

Reserve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बॅकेवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे …