गव्हाण विद्यालयात वैज्ञानिक धडय़ांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | Guide students through scientific lessons Gawhan Vidyalaya amy 95


जयश्री सानप मॅडम व गणेश संसारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना प्रतिकृती व  व्हिडीओंच्या माध्यमातून ( दृकश्राव्य माध्यम)  माध्यमातून स्पष्ट केल्या.

उरण : येथील ‘रयत शिक्षण संस्थे ’ च्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत कनिष्ठ महाविद्यलयामध्ये शालांत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा अधिक समृद्ध व्हाव्यात व अभ्यासक्रमातल्या संकल्पना अधिक सुस्पष्ट व्हाव्यात यासाठी फिरत्या  कार्यशाळेचे आयोजन पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. 

जयश्री सानप मॅडम व गणेश संसारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना प्रतिकृती व  व्हिडीओंच्या माध्यमातून ( दृकश्राव्य माध्यम)  माध्यमातून स्पष्ट केल्या. या फिरत्या मार्गदर्शन प्रयोगशाळेत विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. डब्ल्यु.एन.एस.कंपनीच्या वतीने उपलब्ध असणाऱ्या पेजवरील प्रश्नावलींच्या माध्यमातून रेश्मा सोनवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली काही स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना या विषयाचे धडे दिले. सानप व  संसारे सर आणि रेशमा सोनवणे  यांच्यासह सेवा सहयोग फाउंडेशनच्या इतर सर्व स्वयंसेवकांनी या फिरत्या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साक्षर करून सायबर क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण बाबींविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी दिली.  कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी  विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे, ज्योती माळी ,वृषाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर ,योगिता पाटील, प्रसन्न ठाकूर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर आदींनी सहभाग होता.

हेही वाचा :  आधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे; नाना पटोले यांचा हल्लाबोल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …