fish prices soar in uran due to shortage in supply zws 70 | आवक घटल्याने मासळी महाग


पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते १२०० रुपयांवर पोहचले आहेत.

उरण : होळी व धुळवडच्या निमित्ताने खवय्ये मासळीला पसंती देतात. मात्र या वर्षी मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आवक घटल्याने मासळी महाग झाली आहे. पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते १२०० रुपयांवर पोहचले आहेत.

मासळीचे घटते प्रमाण, सातत्याने वातावरणातील बदल, शासनाच्या जाचक अटी, मच्छीमारांचे रखडलेले अनुदान आदी कारणांमुळे मासळी आवक घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

होळी आणि धुळवडीच्या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक एकत्र येतात. या दिवशी मटण, मासे याला मागणी असते. समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडून आपल्या आवडत्या मासळीचा आस्वाद घेतला जातो. समुद्र किनाऱ्यालगत तसेच शेजारील शहरात राहणाऱ्या नागरिकांकडूनही मासळीचा आस्वाद घेतला जातो. मात्र यावर्षी त्यांना मासळीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. ४०० ते ६०० रूपये किलो असलेल्या कोळंबीचा दर एक हजार रुपये.  सुरमई व पापलेट ६०० ते ७०० रुपयांवरून  १२०० रुपयांवर पोहचला आहे. 

सध्या मासळीचा मोठा हंगाम नाही. त्यात होळीसाठी बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे मासळीच्या प्रमाणात घट झाल्याने दरात वाढ झाली आहे. साध्या मासळीवर समाधान मानावे लागत आहे. होळीनंतरच आवक वाढ होण्याची शक्यता आहे.सुधीर पाटील, मच्छीमार

हेही वाचा :  VASTU TIPS: या वस्तू घरात ठेवाल तर येईल दारिद्रय...ताबडतोब हलवा नाहीतर काढूनच टाका...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …