Dr Nagraj Manjule : अॅक्टर, डायरेक्टर नंतर आता डॉक्टर नागराज मंजुळे!

Dr. Nagraj Manjule D. Litt : लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांच्या नावापुढं आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. मंजुळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून (DY Patil University) मोठा सन्मान करण्यात आला आहे. मंजुळे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पिस्तुल्या (Pistulya), फॅंड्री (Fandry), सैराट (Sairat) आणि आता झुंड (Jhund) अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती करत मंजुळे यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लेखन, दिग्दर्शनासह त्यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला आहे. त्यांच्या याच योगदानामुळं त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून D. Litt बहाल करण्यात आली आहे. 

नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी सर्वात आधी ही बातमी चाहत्यांसाठी शेअर केली. त्यांनी डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, अंधारलेल्या दिवसात एम.फिल किंवा SET/NET अशी तुमचा इच्छा होती. यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आठवतात. तुमचा 10 वी इयत्ता सोडल्यापासून ते डी.लिटपर्यंतचा एक अविश्वसनीय स्वप्नवत प्रवास आहे. चित्रपटांसाठी प्रतिष्ठित अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर तुम्हाला डी वाय पाटील विद्यापीठाद्वारे डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे. याचा साक्षीदार होणं हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असं लोखंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

हेही वाचा :  अमिताभ यांच्या 'झुंड' चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य | jhunds producer savita raj defended kapil sharma on controversy about the movie

नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. नवख्या कलाकारांसह केलेल्या या कलाकृतीचं दिग्गज कलाकारांनी कौतुक केलं आहे. मंजुळे यांनी याआधी फँड्री, सैराट हे सिनेमे दिग्दर्शित केले होते. यात सैराटनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मराठी चित्रपटाच्या इतिहासात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. त्याआधी फँड्री सिनेमाची देखील खूप चर्चा झाली होती. फँड्री या चित्रपटासह पिस्तुल्या या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

सोबतच मंजुळे यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला आहे. फँड्री, सैराटमधील छोट्या भूमिकांसह नाळ चित्रपटात प्रमुख भूमिका त्यांनी केली होती. झुंडमध्येही ते दिसून आले आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दलच त्यांना डीवाय पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे. 

इतर संबंधित बातम्या

पुण्यातील बालसुधारगृहातील मुलांसोबत नागराज मंजुळेंनी Jhund पाहिला!

Nagraj Manjule : झुंड आणि कश्मीर फाइल्सवरुन सोशल मीडियावर मतमतांतर, नागराज मंजुळे म्हणाले…

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

 


 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …