दिवाळीतील सुट्टीनंतर महाविद्यालये गजबजली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळीतील सुट्टीनंतर शुक्रवारपासून महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. शैक्षणिक सत्रातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असून नियमित तासिकांच्या अनुषंगांनी महाविद्यालयांनी तयारी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांत ४८६ महाविद्यालये आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये शुक्रवारपासून शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या चौदा दिवसांच्या सुट्टीनंतर नियमित तासिकांना सुरुवात होणार असल्याने महाविद्यालये पुन्हा गजबजणार आहेत. विद्यापीठातर्फे दिवाळीची सुट्टी २१ ऑक्टोबरपासून ते तीन नोव्हेंबरपर्यंत होती. दुसरे सत्र सुरू होताच विद्यापीठाने परीक्षा सुरू होईल असे स्पष्ट केले होते, परंतु विद्यापीठाने नुकतेच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे आता सर्व अभ्यासक्रमाच्या नियमित तासिका सुरू होतील, यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. अनेक महाविद्यालयांनी नियमित तासिकांचे वेळापत्रक, शैक्षणिक सत्रातील उपस्थितीबाबत विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे कळविले असल्याचे सांगण्यात आले. काहींनी सूचना फलकांवरही वेळापत्रक, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.

काही महाविद्यालयांनी सूचनापत्र शिक्षकांमार्फत सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत महाविद्यालय प्रशासनाला साशंकता आहे.

मेसचे कट्टे बहरणार

दिवाळीच्या सुट्टीनंतर महाविद्यालयांमधील कट्ट्यावर पुन्हा मित्रांची गप्पांची मैफल दिसणार आहे. मेसचे कट्टे बहरणार आहेत. शहरात बहुतांश महाविद्यालयात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. महाविद्यालयातील वसतिगृह, किंवा महाविद्यालय परिसरात रूम घेऊन राहण्याचा विद्यार्थी, पालकांचा आग्रह असतो. परीक्षेच्या वेळापत्रकात विद्यापीठाने बदल केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अभ्यासक्रमाच्या सरावासाठी वेळ मिळाला असेही सांगण्यात येते तर, काही महाविद्यालयांचे अभ्यासक्रम अपूर्ण असल्याचेही सांगण्यात येते.

हेही वाचा :  शिक्षण आणि नोकरी एकत्र करताय? 'या' टिप्स करिअरमध्ये येतील उपयोगी

MPSC Exam: राज्यसेवा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षांसदर्भात अपडेट

परीक्षांचे नियोजन

विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम परीक्षांचे वेळापत्रक चार नोव्हेंबरपासून सुरु होणार होते. त्यासाठी विद्यापीठाने अर्जही भरून घेतले, परंतु ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. तीन लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सांगितले. त्यामुळे आता तासिकांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांत महाविद्यालये ४८६

बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमाची विद्यार्थी संख्या ३ लाख १२ हजार

अभियांत्रिकी प्रथम सत्रातील तासिका सात नोव्हेंबरपासून

सीईटी सेलद्वारे होत असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची प्रथम वर्षातील तासिका सुरू करण्याचे निश्चित वेळापत्रक नाही. औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम सत्रातील तासिका सात नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. अध्यापक पदवी, औषधनिर्माणशास्त्र पदवी, विधी अशा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तासिकांचे वेळापत्रक लांबणीवर गेले आहे. प्रवेशाची प्रक्रिया यंदा लांबली त्यामुळे तासिकांचे वेळापत्रक लांबले.

वेळापत्रकानुसार दुसऱ्या सत्राला सुरूवात होत आहे. नियमित तासिका सुरू होत असल्याने त्यादृष्टिकोनातून तयारी करण्यात आली. अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी, नियमित तासिकांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. कारण परीक्षा २२पासून सुरू होत आहेत त्यामुळे अभ्यासक्रमाची उजळणी, सराव करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे.

हेही वाचा :  Maha PWD Recruitment 2023

डॉ. आनंद चौधरी, प्राचार्य, वसंतराव नाईक महाविद्यालय
नॅक पुनर्मूल्यांकन नसल्यास महाविद्यालयांचे प्रवेश थांबवणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …