नकार स्विकाराला शिका, या मानसिक स्थितींमुळे नात्यात येतो दुरावा

रोमियो-जूलियट, हिर-रांझा अशा कित्येक प्रेमकहाण्या व प्रेमवीर आहेत ज्यांना कधीच विसरता येणार नाही, कारण त्यांनी प्रेमात इतिहास रचलाय. पण हेही तितकंच खरं आहे की, सर्वांचीच प्रेमकहाणी एकसारखी नसते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याही आयुष्यात प्रेम व प्रेम करणारा जोडीदार असावा असं वाटतं, पण ब-याच लोकांना त्यातील पूर्ण सत्यताच माहित नसते. कधी कधी प्रेमात नकार मिळतो तो देखील स्विकारण्याची माणसाची ताकद असणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : @pexels)

​दिवसा स्वप्न पाहाणे

कधी कधी नात्यांमध्ये दुराव जास्त अपेक्षा केल्यामुळे देखील येतो. त्यामुळे नात्यात जास्त अपेक्षा ठेवू नका. स्वत: स्वप्न पाहून आपला जो़डीदार तसाच वागेल ही अपेक्षा करणे खूप चुकीच आहे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होईल.

​प्रत्येक गोष्टीला हो बोलणे

तुमच्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीली हो बोलणे सोडून द्या. तुम्हाला तुमचे मत आहे या गोष्टीचे भान असू द्या यामुळे तुम्ही स्वत:चे व्यक्तीमत्व गमवून बसाल. त्यामुळे असं करु नका तुमच्या मतांना ठामपणे समोरच्या व्यक्तीसमोर मांडा.

हेही वाचा :  नाद खुळा Video: गणरायासमोर जगप्रसिद्ध ड्रमरची पुणेकर ढोल-ताशा पथकाबरोबर जुगलंबदी; एकदा पाहाच

​दुसऱ्यांच्या आनंदासाठी नेहमी हो बोलणे

कधी कधी आपण दुसऱ्यांच्या आनंदासाठी हो बोलतो. पण या गोष्टीची समोरच्या व्यक्तीला सवय होते. त्यामुळे काही गोष्टी वेळीच सुधारा शेवटी तुमचा आनंद महत्त्वाचा आहे ही गोष्ट समजून घ्या.

​सीमा न बनवणे

कोणत्याही नात्यामध्ये सीमा असणं फार महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये सीमा बनवा. यामुळे तुमचे नाते चांगले होण्यास मदत होईल. (वाचा :- Living Happy Married Life: या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, सुधा मूर्ती यांनी दिला गुरुमंत्र)

​अती काळजी

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराची खूप काळजी घेता तेव्हा या काळजीचा त्याला त्रास होऊ लागतो. त्यामुळे तुमचे कामावर लक्ष ठेवा. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​एखाद्याचा नकार स्विकारा

जोडीदाराने जर तुम्हाला नकार दिला तर तो स्विकारा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचे प्रेम स्विकारु शकता तर त्याचा नकार देखील स्विकारायला शिका. (वाचा :- या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, Sudha Murthy यांनी दिला गुरुमंत्र)

हेही वाचा :  Tips to spot farzi note : तुमच्या खिशातील नोट खरी का फर्जी, कशी ओळखाल? या सोप्या टीप्स करा फॉलो

​भावनिकदृष्ट्या सक्षम व्हा

नात्यात भावनिकदृष्ट्या सक्षम असणं फार गरजेच असते त्यामुळे कोणीही तुमच्या भावनांशी खेळू शकणार नाही याची काळजी घ्या. (वाचा :- विक्रम गोखलेंचा ‘या’ बेस्टफ्रेंडने दिली त्यांना आयुष्यभर साथ, नात्यांना जपण्याची कला शिकण्यासारखी)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …