ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!

Cristiano Ronaldo Signs For Saudi Arabian Club Al Nassr: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर  (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे. रोनाल्डोचा करार किती वर्षासाठी आहे आणि रोनाल्डोला एका वर्षासाठी भारतीय चलनात किती पैसे मिळतील जाणून घेऊया.

अल नासरनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत करार केल्याची माहिती दिली. “हा एक असा करार आहे, जो केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमच्या देशाला, येणाऱ्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रेरित करेल. नव्या घरात रोनाल्डोचं स्वागत आहे.”

अल नासरचं ट्वीट-

 

हेही वाचा :  आधी जाडेजाची धमाकेदार फलंदाजी, मग फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी,भारताकडे दिवसअखेर 466 धावांची आघाडी

रोनाल्डोचा अल नासरसोबत विक्रमी करार
मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत 2025 पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला 200 दक्षलक्ष युरो मिळतील म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याला एका वर्षाला 17 अब्ज रुपये मिळतील, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल. या अगोदर ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि त्याचा माजी क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला होता. परंतु काही काळापूर्वी रोनाल्डोने वादानंतर हा क्लब सोडला.

अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यानंतर रोनाल्डोची प्रतिक्रिया
सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्बलशी करार केल्यानंतर रोनाल्डो म्हणाला की, “मी वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्सुक आहे. अल नासेरच्या कार्यपद्धतीची दृष्टी खूप प्रेरणादायी आहे आणि मला माझ्या नवीन सहकाऱ्यांशी जुडताना आनंद होत आहे. एकत्रितपणे आपण संघाला मोठे यश मिळवून देऊ शकतो.”

हे देखील वाचा-Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …