स्पर्धा परीक्षांचा ‘अभ्यास’ आता रेडिओच्या मदतीने!

आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओ (AIR) ने स्पर्धा परीक्षांची (Competitive Exams) तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. प्रसार भारती अंतर्गत अखिल भारतीय वृत्तसेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया रेडिओने सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ‘अभ्यास’ हा साप्ताहिक कार्यक्रम सुरू केला आहे. आकाशवाणीच्या साप्ताहिक कार्यक्रमांतर्गत सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक संवादात्मक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण शनिवार, ३ एप्रिल २०२२ पासून ऑल इंडिया रेडिओवर सुरू झाले आहे.

३० मिनिटांचा पूर्ण कार्यक्रम
ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाने माहिती दिली की, ‘अभ्यास’ या ३० मिनिटांच्या कार्यक्रमाचा पहिला भाग दर शनिवारी रात्री ९.३० वाजता १००.१ एफएम गोल्डवर प्रसारित होईल. अभ्यास नावाचा हा उपक्रम विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या सरावाचा पहिला भाग आधुनिक इतिहासावर आधारित होता.

दर शनिवारी नवीन विषयावर कार्यक्रम होईल
आकाशवाणीच्या वतीने हा कार्यक्रम दर शनिवारी रात्री ९.३० ते १० या वेळेत प्रसारित केला जाईल. ऑल इंडिया रेडिओने सांगितले की साप्ताहिक संवादी कार्यक्रमात एक्सप्लेनर, फॅक्ट फाइल, परीक्षा कॅलेंडर आणि आठवड्याचे प्रश्न यासारखे विभाग असतील. पुढील कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओच्या चॅनल क्रमांक १००.१ एफएम गोल्डवर शनिवारी, ९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाईल.

हेही वाचा :  UPSC उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंगची गरज नसते, IAS सलोनी वर्माचा सक्सेस मंत्रा जाणून घ्या

ECIL Recruitment 2022: ITI उत्तीर्णांसाठी बंपर भरती; १६०० रिक्त पदे

एप्रिलमध्ये शाळा: नियोजनाचा गोंधळ; सोमवारपासूनच्या वेळापत्रकाबाबत उत्सुकता

कार्यक्रमात कुतूहलाचे निरसन
या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार ऑल इंडिया रेडिओच्या ट्विटर हँडल @airnewsalerts किंवा YouTube चॅनल airnewsofficial आणि AIR चे मोबाईल अॅप NewsonAir द्वारे देखील कनेक्ट होऊ शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ९ एप्रिल रोजी प्रसारित होणाऱ्या पुढील भागासाठी, उमेदवार ५ एप्रिलपर्यंत ९२८९०९४०४४ या WhatsApp क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर त्यांचे प्रश्न पाठवू शकतात. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची थीम भारतीय राजकारण आणि संविधानावर आधारित असेल.

JEE Main 2022 Exam: जेईई मेन परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ
IBPS Clerk Mains Result 2022 आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
IIT Madras: ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही करता येणार BSc डेटा सायन्ससाठी अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …