CMAT Exam 2022: सीएमएटी परीक्षेसाठी ‘येथे’ करा अर्ज, पात्रता निकष जाणून घ्या

CMAT Exam 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएमएटी २०२२ नोंदणी फॉर्म जाहीर केला आहे. सीएमएटी परीक्षेची तयारी करत असणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर जाऊन सीएमएटी २०० (CMAT 2022) नोंदणी करु शकतात. १७ मार्च २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी सीएमएटी नोंदणी फॉर्म भरण्यापूर्वी पात्रता निकष जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीएमएटी २०२२ नोंदणी विंडो बंद झाल्यानंतर एनटीएकडून सर्व नोंदणीकृत उमेदवारांसाठी एक करेक्शन विंडो उघडण्यात येईल.

सीएमएटी अर्ज २०२२ भरताना उमेदवारांना पुरुष उमेदवारांना २००० रुपये तर महिला उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या मदतीने ऑनलाइन माध्यमातून सीएमएटी अर्ज भरता येणार आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कागदपत्रांची स्कॅन कॉपी जसे की पूर्वीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

Army ADG Recruitment: अतिरिक्त डायरेक्टोरेट जनरल अंतर्गत विविध पदांची भरती
असा करा अर्ज (CMAT application form 2022)
एनटीए सीएमएटी (NTA CMAT) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. CMAT २०२ साठी नोंदणी करा. सीएमएटी २०२२ अर्ज भरा आणि पासवर्ड टाका. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. CMAT साठी अर्ज शुल्क भरा. कन्फर्मेशनचे पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी जपून ठेवा.

हेही वाचा :  तुकडीवाढचे अधिकार राज्य सरकारकडे

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
पात्रता निकष
सीएमएटी परीक्षेसाठी नोंदणी करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी देखील सीएमएटी २०२२ साठी अर्ज करु शकतात. उमेदवारांकडे भारताचे नागरिकत्व असावे. सीएसएटी २००२२ अर्ज भरण्यासाठी एक वॅलिड ईमेल-आयडी आणि फोन नंबर, स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग असणे गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Recruitment: ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती
TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

Employees Provident Fund Organisation Invites Application From 2859 Eligible Candidates For Social Security Assistant & …

भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती

Agriculture Insurance Company of India Limited Invites Application From 40 Eligible Candidates For Management Trainee …