मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे शुल्क पुन्हा वाढणार? ग्राहकांच्या खिशाला चटका

 

मुंबई : मागील वर्षी दूरसंचार कंपन्यांनी कॉलिंगचे तसेच इंटरनेटचे दर वाढवले होते. यावर्षीदेखील कॉलिंग आणि इंटरनेटच्या शुल्कांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने या दाव्याला दुजोरा देत म्हटले की, 2022 मध्येही मोबाइल कॉल आणि सेवांचे दर वाढतील. 

प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) 200 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, एअरटेलने सर्वप्रथम मोबाइल आणि सेवांचे दर 18 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवले.

येत्या तीन महिन्यात शक्यता कमीच

भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल म्हणाले की, मला वाटते की 2022 मध्ये टॅरिफ दर वाढतील. मात्र, येत्या तीन-चार महिन्यांत असे होणार नाही.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही शुल्कवाढीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही योग्य वेळी पुढाकार घेऊ. कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करताना विश्लेषकांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

डिसेंबर तिमाहीत एकात्मिक निव्वळ नफ्यात घट

भारती एअरटेलचा डिसेंबर तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा 2.8 टक्क्यांनी घसरून 830 कोटी रुपयांवर आला आहे. या तिमाहीत कंपनीचे एकात्मिक उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले आहे. विट्टल म्हणाले की आम्हाला आशा आहे की आमचा ARPU 2022 मध्येच 200 रुपयांपर्यंत पोहोचेल. येत्या काही वर्षांत ते 300 रुपयांपर्यंत पोहोचेल अशी आमची अपेक्षा आहे.

हेही वाचा :  Maruti Suzuki च्या 'या' गाड्यांना सर्वाधिक मागणी, जबरदस्त फीचर्स आणि किंमत 3.4 लाखापासून होते सुरु

भारतात एअरटेल 4G ग्राहक

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत भारतातील Airtel चे 4G ग्राहक वार्षिक 18.1 टक्क्यांनी वाढून 19.5 कोटी झाले. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ही संख्या 16.56 कोटी होती. भारतातील एअरटेलच्या नेटवर्कवरील प्रति ग्राहक डेटा वापर 16.37 GB वरून 18.28 GB पर्यंत 11.7 टक्क्यांनी वाढला आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल ने तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. …

PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका

नवी दिल्लीः पॅन कार्डचा वापर करणाऱ्यांनी आता आणखी अलर्ट राहण्याची गरज आहे. तुमची एक चूक …