Celebrity Beauty Secrets : मिथून चक्रवर्तीची हॉट-बोल्ड सूनबाई पाहिली का? मादक फोटो पाहून व्हाल घायाळ..!

मिथुन चक्रवर्ती (mithun Chakraborty) यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची सून मदालसा शर्मा (madalsa sharma) सध्या प्रसिद्धी मिळवत आहे. सध्याची सर्वाधिक टीआरपी असणारी सिरीयल अनुपमा मधील तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि जाणकारांकडून देखील खुप प्रशंसा मिळत आहे. आपल्या अभिनया शिवाय ती अजून एका गोष्टी साठी प्रसिद्ध होत आहे आणि तिच्या चाहत्यांमध्ये दिवसागणिक भरच पडत आहे. ती गोष्ट म्हणजे तिची ग्लोइंग स्किन होय. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आणि ती जिथे जाईल तिथे तिला एकच प्रश्न विचारला जातो की, “तुमची स्किन एवढी ग्लोइंग कशी?” जर तुम्हाला देखील मदालसाचं ग्लोइंग स्किन सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर आज तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिचं ब्यूटी सिक्रेट आणि काही स्पेशल टिप्स! (फोटो साभार: मदालसा शर्मा इंस्टाग्राम)

नैसर्गिक सौंदर्य

आपल्यापैकी अनेकांना वाटू शकतं की मदालसाचं हे सौंदर्य मेकअपमुळे खुलत असेल किंवा तिने काही ब्यूटी ट्रीटमेंट घेतली असेल पण असं मुळीच नसून तिचं हे सौंदर्य पूर्णत: नैसर्गिक आहे. तिला आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअपची देखील गरज नाही. टीव्हीवर अभिनय करताना तर तिला मेकअप करावाच लागतो पण खऱ्या आयुष्यात तिला कोणी पाहिलं तर खरंच तिच्या प्रेमात पडेल असं तिचं सौंदर्य आहे. पण असं अस्सल सौंदर्य तिने मिळवलं तरी कसं? चला तेच जाणून घेऊया.

हेही वाचा :  Maratha Reservation : 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, खासदार संभाजीराजे यांचे CMना पत्र

(वाचा :- Hair Growth : 1 महिन्यात कंबरेपेक्षाही लांब व घनदाट होतील केस, टक्कल पडलेल्या जागीही येतील केस, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय!)

हॅप्पी लाईफ

मदालसा म्हणते की बाहेरून सुंदर दिसण्यासाठी खूप काही करता येऊ शकतं, पण जर तुम्हाला चिरतरुण सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आतील सौंदर्यावर काम करावं लागेल. जेव्हा तुम्ही मनापासून आतून खुश राहाल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही बाहेरून सुद्धा सुंदर दिसाल.त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरजच नाही. मदालसा आपल्या कामावर खूप प्रेम करते. काम केल्यावर तिला आतून समाधान मिळते आणि ती अधिक आनंदी राहते. (फोटो साभार: मदालसा शर्मा इंस्टाग्राम)

(वाचा :- Hair Care Tips : चहापावडरचा असा वापर केल्यास कमी वेळात मिळतील लांबसडक, घनदाट व कापसासारखे रेशमी केस, फक्त माहित हव्या ‘या’ 4 पद्धती!)

रोज पिते नारळ पाणी

एका मुलाखतीमध्ये आपले ब्युटी सिक्रेट शेअर करताना मदालसा म्हणाली होती की ती उत्तम त्वचेसाठी रोज नारळ पाणी पिते. ही सवय खूप काळ आधीपासूनच तिने स्वतःला लावून घेतली आहे. तिला तिच्या डायटीशीयनने अधिकाधिक पाणी प्यायला सांगितले सोबत नारळ पाणी सेवन देखील सूरु करायला सांगितले. तिला काही दिवसांतच या सल्ल्याचा फरक दिसला आणि तेव्हापासून ती रोज न चुकता ही गोष्ट फॉलो करत आहे. (फोटो साभार: मदालसा शर्मा इंस्टाग्राम)

(वाचा :- Yoga Asanas For white Hair : वयाच्या 70री नंतरही केस राहतील काळेभोर व लांबसडक, फक्त डेली रूटीनमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी!)

हेही वाचा :  Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं

मेकअप प्रेमी मदालसा

मदालसा स्वतः एक मेकअप आणि फॅशन जाणकार आहे. तिला याबद्दल खूप ज्ञान असून ती नेहमी लेटेस्ट ट्रेंड आणि अपडेट फॉलो करत असते. तिच्याकडे मेकअपचे मोठे कलेक्शन असुज तिचे सर्वात आवडते प्रोडक्ट हे लिपस्टिक आहे. तिला बदलत्या ट्रेंड सोबत राहायला आवडते. तुम्हाला दरोरोज मदालसाच्या लूक मध्ये काही ना काही फरक दिसणार. ती शक्य तेवढे ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि हा तिचा सर्वात आवडता टाईमपास आहे. (फोटो साभार: मदालसा शर्मा इंस्टाग्राम)

(वाचा :- White Hair Remedies : पांढरे केस होतील चुटकीमध्ये काळेभोर व चमकदार, 1 रूपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅच्युरल उपाय..!)

सौंदर्याबद्दलच्या विचारांत बदल

भूमी म्हणते की जस जसा काळ लोटत गेला तस तसे माझे सौंदर्याबाबतचे विचार सुद्धा बदलत गेले. मला जाणीव झाली की केवळ बाहेरून सुंदर दिसणे एवढीच सौंदर्याची व्याख्या नाही. तुम्ही आतून एक व्यक्ती म्हणून कसे आहात? तुम्ही मनापासून खुश किती आहात? तुम्ही स्वत:च स्वत:ला किती आवडता? तुम्ही दुसऱ्यांसाठी नटत नाही ना? य सगळ्या गोष्टी बाहेरील सौंदर्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. हेच कारण आहे की भूमी सुद्धा सर्वांना अशाच प्रकारच्या सौंदर्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला देते.

(वाचा :- Remedies For Hair Growth : 1 महिन्यात 4 ते 6 इंचाने लांबसडक व घनदाट होतील केस, 60ठी नंतरही गळणार नाहीत, करा ‘हे’ उपाय!)

हेही वाचा :  सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...

स्वतःसाठी वेळ

मदालसा अशा व्यक्तींपैकी आहे जी स्वतःला खूप वेळ देते, स्वतःवर खूप प्रेम करते. तिची इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यावर तुमच्या देखील लक्षात येईल की तिला फिरायला खूप आवडतं. ती शक्य तेवढं जास्त फिरते. आपल्या लोकांना, आपल्या कुटुंबाला वेळ देते. यातून तिला स्वतःला खूप आनंद मिळतो. जसं की मदालसाचं मत आहे की तुम्ही आतून खुश राहा, तर बाहेरून सुद्धा खुशच दिसाल. तर मंडळी हा मोलाचा सल्ला लक्षात ठेवा आणि आऊटर ब्यूटी प्रमाणे इनर ब्यूटीवर सुद्धा लक्ष द्या. (फोटो साभार: मदालसा शर्मा इंस्टाग्राम)

(वाचा :- Amla Uses For Skin : 50 शीत दिसायचं आहे 20 शी सारखं तरूण? मग फक्त 10 रूपयांच्या ‘या’ गोष्टीचा असा करा वापरा..!)

बीचवर एन्जॉय करणारी मदालसा..

करीना कपूरच्या गाण्यावर डान्स करताना मदालसा..!Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …