राजकारण

‘फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, आता जेलमध्ये टाकायचंय’ ठाकरे गटाची जहरी टीका

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय, पुढच्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. लातूरमधल्या औसा तालुक्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी गृहमंत्री अमित …

Read More »

ठाणे-बोरीवली अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; MMRDAच्या बजेटमध्ये ४०००.०० कोटींची तरतूद

Thane-Borivali Twin Tube Tunnel Road: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन २०२४-२५ साठीचा सादर करण्यात आला आहे. ४६,९२१.२९ कोटींची तरतूद मुळ अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात सुमारे रू. ४१,९५५.३४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठीही निधी देण्यात आला आहे. त्यामुळंच लवकरच हा …

Read More »

‘मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर…’, शरद पवारांचं थेट चॅलेंज; ‘मोदी की गॅरंटी’च्या खर्चावरुनही कडाडले

Sharad Pawar Challenge To PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील आठवड्यात यवतमाळमधील सभेमध्ये थेट उल्लेख न करता माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. टकेंद्र सरकारमध्ये सध्याच्या इंडिया आघाडीचं सरकार होतं तेव्हाचे केंद्रीय कृषीमंत्री महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे. मात्र मधल्या मध्येच ती लुटली जायची,’ असा घणाघात मोदींनी केला होता. काँग्रेसचं सरकार असताना …

Read More »

शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा

Shivsena MLA Disqualification Case: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता प्रकरणात केलेल्या सुनावणीविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची संपूर्ण प्रत सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहे. 8 एप्रिल रोजी या सुनावणीवर सविस्तर सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतली जाणार आहे. मात्र तोपर्यंत नार्वेकरांनी दिलेले सर्व निकाल स्थगित करण्यात आले आहेत. हा निकाल …

Read More »

‘महापौर केलं, खासदारकी ही तुलाच? आता बस…’; मुरलीधर मोहोळांविरोधात PMCमध्ये बॅनरबाजी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 139 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने जास्त जागांची मागणी केल्याने जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. दुसरीकडे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्येच अंतर्गत जोरदार कलह पाहायला मिळत आहे. उमेदवारीवरुन भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच शीतयुद्ध होताना दिसतय. लोकसभा निवडणूक …

Read More »

‘ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर…’; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला

Loksabha Election 2024 Shinde Group Vs BJP Uddhav Thackeray Gorup Reacts: लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीमधील एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरु असतानाच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला ‘केसाने गळा कापू नका’ असा इशारा भाजपाला दिला आहे. रामदास कदमांच्या या इशाऱ्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सत्ताधारी घटकपक्षांमधील या शाब्दिक …

Read More »

‘केसाने गळा कापू नका’, शिंदे गटाचा इशारा! म्हणाले, ‘..तर भाजपावर कोणीच विश्वास ठेवणार नाही’

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Warns BJP: राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून ते देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंतच बैठकींचं सत्र सुरु असतानाही महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन रस्सीखेच आणि कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपासंदर्भात समोर येत असलेल्या वेगवेगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांचा संयमही यादरम्यान सुटत चालल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील नेते रामदास कदम यांनी केलेल्या …

Read More »

खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोनं 2300 रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरात…, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Hike In Marathi : अनेकांना सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असते. अशातच मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याच्या भावात अनेक बदल पाहायला मिळत आहे. आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसला आहे. सप्टेंबर 2023 ते डिसेंबरपर्यंत सोन्याच्या भावात अधिकच बदल झाल्याचे पाहायला मिळत. त्यातच आज पुन्हा सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. कारण आजही सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली …

Read More »

शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेची होळी स्पेशल ट्रेन, कधी अन् कुठून सुटणार? पाहा…

Holi Special Trains 2024 News In Marathi : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच गावी जायचं म्हटलं की पहिलं प्राधान्य भारतीय ट्रेनला दिले जाते. कारण ट्रेनचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. त्यातच होळी हा सण येतो. कोकणात होळी सणाचा आनंद वेगळात असतो. या सणानिमित्ताने लाखो कोकणवासी मुंबईहून आपापल्या गावी जातात. याचपार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात …

Read More »

पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला अटक

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना लाखों रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लुल्लानगर येथे कारवाई करीत त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी माजी लष्करी कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर …

Read More »

‘1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण…’; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

Uddhav Thackeray And PM Modi Will Form Alliance: लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रम 15 मार्चच्या आसपास जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून जोरदार प्रचारही सुरु केला आहे. ज्या राज्यांमध्ये युती करायची नाही अशा राज्यांमधील अनेक जागांची घोषणा भाजपाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातील दौऱ्यांची संख्याही वाढल्याचं दिसत आहे. एकीकडे …

Read More »

Buldhana LokSabha : प्रतापराव जाधव ठोकणार विजयाचा चौकार? की महाविकास आघाडीचा ‘निर्धार’ पक्का?

Buldhana LokSabha Election 2024 : बुलढाणा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते मातृतीर्थ सिंदखेडराजा… संत नगरी शेगाव… लोणारचं जागतिक दर्जाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर… ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक वारसा लाभलेला बुलढाणा जिल्हा… २००९ पर्यंत राखीव असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला भाजपाचे सुखदेव नंदाजी काळे यांचा अपवाद वगळता जिल्ह्याबाहेरचे पाहुणे खासदारच या मतदारसंघाला लाभले. काँग्रेसचे बाळकृष्ण वासनिक आणि मुकुल वासनिक, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे …

Read More »

‘…तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..’; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

Loksabha Election 2024: जागावाटप, आढावा बैठकी, चर्चांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या हलचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने तर थेट 400 पारची घोषणा दिली आहे. पण भाजपा 400 पार जाणार की नाही हे जनताच ठरवणार आहे. मतदार जे ठरवतील तेच होणार असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये आंबेडकर यांनी हे विधान …

Read More »

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? मुरबाडमध्ये 75 वर्षांच्या वृद्धाला आगीवर नाचवलं, कारण काय तर..

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा, जादूटोणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. याचं एक ज्वलंत उदाहरण ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये समोर आलं आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून 75 वर्षांच्या एका वृद्धाला पेटत्या आगीवर नाचवण्यात आलं. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा (Witchcraft) अस्तित्वात आला तरी देखील या कायद्याला धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या करणी, जादूटोणा आणि भानामतीचे प्रकार असताना उघड होत आहेत. …

Read More »

लोकसभा जागावाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं,’ योग्य सन्मानाप्रमाणे…’

Loksabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता दिल्लीत हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्यासाठी आज (6 मार्च) रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपकडून राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “इतक्या जागा मिळणार, तितक्या जागा मिळणार ही पतंगबाजी …

Read More »

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; पाहा काय आहे कारण

MNS Chief Raj Thackeray : सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उत्तर मुंबई लोकसभा निहाय आढावा दौरा सुरू आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक विशेष संदेश दिलाय. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखं जपा.. कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, असा संदेश राज ठाकरेंनी दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) जोरदार तयारीला लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता …

Read More »

शिरुर मतदारसंघात कोणाची हवा? अमोल कोल्हेंविरोधात शिंदे गट की अजितदादा गट लढणार

हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर :  अष्टविनायकांपैकी रांजणगावचा गणपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची वढूमधली समाधी… कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ… असा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली शिरुरची भूमी. 2008 साली झालेल्या पुनर्रचनेनंतर जन्माला आलेला हा पुणे जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha Constituency). सुरूवातीला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ. शिरूरचं राजकीय गणित2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीच्या विलास लांडेंचा …

Read More »

Baramati loksabha : घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Lok Sabha Elections 2024 : मागील अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतू आता हे समीकरण बदलणार का ? अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे …

Read More »

Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Lok Sabha Election 2024 Supriya Sule vs Ajit Pawar: मागील अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतू आता हे समीकरण बदलणार का ? अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार …

Read More »

आवडीने चिकन खाताय! पण सावधान; नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, 8501 कोंबड्या…

Nagpur News Today: नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे? हे तपासण्यासाठी पुण्याच्या आणि नंतर भोपाळ मधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. …

Read More »