आंतरराष्ट्रीय

‘टेस्ला’च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, ‘इंजिनिअरला…’

Tesla Robot Attacked Worker Elon Musk React: तुम्ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये मानवाने तयार केलेले रोबोट कशाप्रकारे संपूर्ण कारभार हातात घेऊ पाहतात आणि त्यावर त्यांना निर्माण करणारा रजनिकांत कशी मात करतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. मात्र रोबोटने खरोखर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. पण खरोखरच असा प्रकार घडला आहे. हा …

Read More »

विमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतोय तरुणाचे कौतुक, कारण…

Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. …

Read More »

काहीच न करता हा माणूस कमावणार 8300 कोटी; अंबानीही भरत नसतील इतका Tax भरणारा तो आहे तरी कोण?

पैसा कमावणं हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. एकीकडे काहींना एक रुपया कमवालयाही दिवस-रात्र संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे काहीजण मात्र घरबसल्या करोडो रुपये कमावत असतात. एकीकडे फक्त मेहनत असते तर दुसरीकडे मेहनतीला आर्थिक हुशारीची जोड असल्यानेच हे शक्य होतं. अशाच लोकांमध्ये स्टीव्ह बाल्मरदेखील आहेत. त्यांना 2024 मध्ये काही न करण्याचे तब्बल 1 अरब डॉलर्स मिळणार आहेत. भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झाल्यास ही …

Read More »

VIDEO: अजगर आणि मगरीची खतरनाक झुंज कॅमेऱ्यात कैद; कोण जिंकले असेल?

Crocodile Python Fight : अजगर हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. अजगर हा नीलगायसारख्या मोठ्या प्राण्यालाही गिळंकृत करु शकतो एवढा धोकादायक शिकारी प्राणी आहे. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी हा महाकाय अजगारासोबतही लढायला तयार होऊ शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका अजगरालापाण्यातील सर्वात धोकादायक शिकारी मगरीशी लढणं चांगलेच महागात पडलं आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर …

Read More »

5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे.   भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी …

Read More »

Video : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण

Viral Trending Video : जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. नाताळ म्हटलं की, बच्चे कंपनींमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्येही नाताळाचा फिव्हर दिसून येतो. नाताळ हा सण ख्रिश्चन लोकांचा असला तरी तो इतर लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात. नाताळ म्हणजे सांता, सिक्रेट सांता गेम, चॉकलेट, केक आणि खूप सारे गिफ्ट…नाताळ सणानिमित्त एकमेकांना गिफ्ट देण्यात येतं. …

Read More »

ख्रिसमसचं गिफ्टआणि सुजले ओठ…हालत पाहून घरचे टेंशनमध्ये

आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासोबतच आपल्यामध्ये असे काही लोक आहेत जे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. आता बल्गेरियातील एका महिलेने असेच काहीस केलंय. तिचे नाव एंड्रिया इव्हानोव्हा आहे आणि ती जगातील सर्वात मोठी ओठ असलेली महिला म्हणून ओळखली जाते. अँड्रिया इव्हानोव्हा दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तिच्या ओठांमध्ये फिलर्स लावते. अशा परिस्थितीत यंदाही इवानोव्हाने …

Read More »

Date Rape Drug अन् PM सुनक यांचं घर… ब्रिटनमध्ये नवा वाद; थेट राजीनाम्याची मागणी

Date Rape Drug Comment : ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेवरली अडचणीत आले आहेत. क्लेवरली यांनी 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मी माझ्या पत्नीच्या ड्रिंकमध्ये ‘डेट रेप’ नावाचा अंमली पदार्थ टाकला आहे, असा विनोद क्लेवरली यांनी केला. मात्र या विनोदावरुन …

Read More »

हा तर निसर्गाचा चमत्कार! दोन हिश्शात विभागले गेले आकाश, सूर्यास्त होत असतानाच…

Viral Video Of Split Screen Sunset: सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य-अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला तो सोनेरी रंग मन मोहून टाकतो. अवकाशात पसरलेल्या या सोनेरी रंगाच्या छटा खूपच सुंदर दिसतात. पण एकाचवेळी आकाशात सूर्य अस्ताला जाताना पसरलेला सोनरी रंग आणि निरभ्र निळे आकाश असा नजारा तुम्ही कधी पाहिला आहेत का. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ …

Read More »

किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम… प्यायला दिले ‘हे’ पेय

North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन काही दिवसांपूर्वी रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते देशातील महिलांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्याच्याकडे पाहून असे वाटले की, किम जोंग उनला खरोखर आपल्या लोकांची खूप काळजी आहे. किमने नुकतेच असे काहीतरी केले आहे, ज्यावरून असे वाटते की त्याला खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे. …

Read More »

Corona JN.1: कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 52 टक्क्यांनी वाढ; WHO नेही व्यक्त केली चिंता, म्हणाले…!

Corona JN.1: कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अशातच आता JN.1 या नवीन सब व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात घबराट पसरलीये. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळलेत. अशावर आता डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झालीये. या काळात 8 लाख …

Read More »

AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा

Athos Salomé prediction about 2024 : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय AI मुळे प्रायव्हसी देखील धोक्यात आली आहे. डीफेक फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर दिसवेंदिवस वाढत चालला आहे यामुळे अनेकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. यानंतर आता AI च्या भविष्यातील वापराबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.  AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी  साधला जाऊ …

Read More »

‘…नाहीतर मरायला तयार राहा’; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम

Israel Hamas war : इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबवण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या कित्येक दिवसांपासून दोन्ही बाजूकडून संघर्ष सुरु आहे. इतर देशांनी मध्यस्थी करुनही अद्यापही दोन्ही बाजूकडून कोणीही माघार घेतल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे युद्धविराम करारासाठी वाटाघाटी होण्याची शक्यता कमी दिसते. अशातच इस्रायलने हमासला शेवटचा इशारा दिला आहे. आत्मसमर्पण करा, तुमच्याकडे पर्याय नाही असे इस्रायलने म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या …

Read More »

धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील …

Read More »

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). …

Read More »

ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या ‘या’ स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमीनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा… या साऱ्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल. मात्र हे असलं घर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बांधतोय असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. 39 वर्षीय झुकरबर्ग …

Read More »

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर ‘या’ माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे….. झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का?  सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी ‘आर डब’ विलियम्स यानं …

Read More »

मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका

युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं.  लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. …

Read More »

फक्त चीन नाही तर रात्रभर ‘या’ देशांतील जमीन हलत होती; समुद्राचा तळही हादरला

Massive Earthquake: चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपामध्ये 110 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चीनला भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के चीनमध्या जाणवले. मात्र चीनच नाही तर अफगाणिस्तान, म्यानमारबरोबरच भारतामधील लडाखमधील कारगिल आणि अंदमानच्या सुमद्रामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तिव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. मध्यरात्री आलेल्या 6.2 …

Read More »

‘इस्लामला युरोपमध्ये स्थान नाही, इस्लामीकरणाचे प्रयत्न..’; इटालियन PM मेलोनींचे स्फोटक विधान

Italy PM Giorgia Meloni On Islam in Europe: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यांनी इस्लाम धर्मासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. युरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नसल्याचं विधान मेलोनी यांनी केलं आहे. या विधानामुळे मेलोनी यांच्यावर टीका होताना दिसत आहे. “यूरोपचं इस्लामीकरण करण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र इस्लाममधील मूल्य युरोपीयन संस्कृतीबरोबर साधर्म्य साधणारी नाहीत. यूरोपीयन संस्कृती आणि इस्लामिक संस्कृतीमधील …

Read More »