ऑटो

‘माउथ फ्रेशनर’ खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर? हरियाणामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये La Forestta Cafe या रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा …

Read More »

भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?

Trending News In Marathi: लग्नाचे बंधन हे अतूट असते पण हल्लीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि हे वाद विकोपाला जातात. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही लग्नाच्या मांडवातच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन वधु-वरात वाद झाला आणि थेट लग्नच मोडले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  दारात लग्नाचा मांडव पडला होता. नवरदेवही बरात घेऊन आला होता. मात्र, …

Read More »

महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ सरकारचा निर्णय!

Women Pension: दिल्लीच्या अरविंद केजरवील सरकारने 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिलांना दरमहा 1 हजार रुपये पेन्शनचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हिमाचल सरकारने महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फक्त दिल्ली हिमाचलच नव्हे, तर इतरही राज्यांनी काही योजना राबवल्या आहेत. यामध्ये …

Read More »

महाशिवरात्री ते गुड फ्रायडे! मार्चमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी आहे माहितीय का?

March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. …

Read More »

Upendra Singh Rawat : भाजपची दुसरी विकेट! अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उमेदवाराने घेतली शपथ, म्हणाले…

Upendra Singh Rawat Video : भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास नकार दिला. भाजपने गेल्या शनिवारीच पवन सिंह (Pawan Singh) यांना आसनसोल या जागेवरून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी भाजपला नकार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं अशातच आता भाजपला दुसरा मोठा धक्का बसला …

Read More »

EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज

UPSC Epfo Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या ईपीएफओमध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

तरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षणाचा फोटो केला शेअर; पुढच्या काही तासात लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या

कोलकात्यात एका 32 वर्षीय तरुणाची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासह पत्नी आणि लहान मुलगा होता. तिघेही फोटोत आनंदात दिसत होते. हा फोटो शेअर करताना त्याने ‘कुटुंब’ अशी कॅप्शन दिली होती. पण काही तासांनी कुटुंबावर इतका मोठा दु:खाचा डोंगर कोसळेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.  …

Read More »

आधी UPSC अवघ्या 2 गुणांनी हुकली, पुन्हा प्रयत्न करुन 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षतच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा

Akshat Jain IAS Story: भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो युवा आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. पण याचील काहीजणच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन स्वप्न पूर्ण करतात. यातील काहीजण एकदा नापास झाल्यास दुसऱ्या क्षेत्रात जातात. पण काही यूपीएससीवर अटल राहतात. आणखी प्रयत्न करतात. स्वत:वर मेहनत घेतात आणि यूपीएससी उत्तीर्ण करतात. आयएएस अक्षत जैन यांची कहाणी अशीच प्रेरणा देणारी आहे. याबद्दल जाणून घेऊया. …

Read More »

महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये; काय आहे मुख्यमंत्री महिला कल्याण सन्मान योजना?

Budget 2024 : काही दिवसांपूर्वीच देशाच्या अर्थसंकल्पामधून नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये महिला वर्गाच्या दृष्टीनंही काही महत्त्वाचे संदर्भ पाहायला मिळाले. त्यामागोमागच आता महिला वर्गाच्या दृष्टीनं आणखी एक योजना आखण्यात आली असून, राज्याच्या अर्थसंकल्पातून त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना असं त्या योजनेचं नाव असून, प्रत्येक महिलेला दर महिन्याला शासनाच्या वतीनं 1000 रुपये देण्याचा निर्णय …

Read More »

पठ्ठ्या चक्क झाडूने बॅडमिंटन खेळला; VIDEO जबरदस्त व्हायरल

बॅडमिंटन खेळताना समोरच्या खेळाडूला चितपट करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. बॅडमिंटन हा तसा वेगवान खेळ असून, अचूक फटके मारण्यासाठी लक्ष विचलित न होता खेळावं लागतं. पण जर तुम्ही बॅडमिंटन खेळतात हातात रॅकेटच्या जाही एखादी काठी किंवा झाडू दिला तर? आता तुम्ही म्हणाला त्याच्याने कसं काय खेळायचं? पण जर तुम्ही सराव केला तर काहीही अशक्य नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल …

Read More »

Women’s Day 2024: अश्लीलतेविरोधातील ‘हे’ कायदे तुम्हाला माहितीयेत? महिलांनो ‘या’ अधिकारांविषयी तुम्हालाही माहिती असणं गरजेचं!

International Women’s Day 2024 In Marathi: महिलांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या अधिकारांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत अनेक अधिकार आणि अधिकारांचा समावेश होतो. यामाध्ये कामाचे तास, पगार या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. अशा परिस्थितीत ज्या महिलांना समाजात पुढे जायचे आहे, त्यांच्याशी भेदभाव केला जातो. …

Read More »

धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण ‘या’ हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला

Business News : देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये भक्कम झाली असून, त्या अनुषंगानं देशाचा आर्थिक विकासही सकारात्मक वाटेनं सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. आकडेवारी आणि वस्तुस्थिती हेच दर्शवत आहे. पण, असं असतानाच खिशात येणारी रक्कम, अर्थात कामाचा मिळणारा मोबदला किंवा मिळणारा पैसा काही केल्या पुरत नाही आणि उरतही नाही असा सूर आळवणारेही अनेक भारतीय आहेत. इथंही उभा राहणारा एक महत्त्वाचा …

Read More »

नवऱ्याने 10 रुपयांऐवजी आणली 30 रुपयांची लिपस्टिक, पत्नी घऱ सोडून गेली माहेरी; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. आपण 10 रुपयांची लिपस्टिक मागवली असताना, पतीने 30 रुपयांची लिपस्टिक आणल्याने पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. वाद इतका वाढला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. इतकंच नाही तर घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं. पत्नीला 30 रुपयांची लिपस्टिक इतकी महाग वाटली की, तिने माहेर गाठलं. पतीने आपल्यासाठी 10 रुपयांचीच …

Read More »

Post Office ची कमाल योजना, घरबसल्या महिन्याला कमवा 20 हजार, आत्ताच प्लान समजून घ्या

Post Office Senior Citizen Savings Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही हिस्साची गुंतवणूक करत असतो. जिथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि गरजेच्या काळात योग्य परतावा मिळेल हा विचार करुन गुंतवणूक करत असतो. म्हातारपणी याच गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल या हेतूने पैसे गुंतवले जातात. देणेकरुन म्हातारपणी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठीच पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. पोस्ट ऑफिसची …

Read More »

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होता समोर आले व्हिडीओ

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. मात्र आता उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजप खासदाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या या खासदाराचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खासदाराने तक्रार दाखल केली असून आपल्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचे म्हटलं …

Read More »

LokSabha: ‘पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,’ तिकीट नाकरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून एकूण 34 विद्यमान खासदारांना वगळलं आहे. यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार असताना अनेक वादग्रस्त विधानं केली होती. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. कदाचित माझे काही शब्द नरेंद्र मोदींना …

Read More »

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! लग्नाला नकार दिल्याने मुलीलाच संपवले

Crime News Angry Father Killed Daughter: संतापलेल्या अवस्थेत केलेली कृती संकटांना आमंत्रण देते असं म्हटलं जातं. अनेकदा हा रागच अनेक समस्यांच्या मूळाशी असतो. या रागामुळे आपण संकटात सापडू शकतो. संतापलेले असताना घेतलेला एखादा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करु शकतो. अनेकांना क्रोधाच्या परिणामांची कल्पना असते. मात्र त्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. अशाच 2 हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी …

Read More »

‘जा जिंकून या, मग पुन्हा भेटू…’; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

PM Narendra Modi Meeting : देशभरात काही दिवसांतच  लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालीय. भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून तिसऱ्यांचा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्ट शब्दात …

Read More »

वडिलांच्या कानाखाली लावली, आईला केसाला धरुन फरफटत आणलं; जमीन भावाच्या नावे केल्याने मुलाचा प्रताप

जमीन, संपत्तीसाठी कुटुंबांमध्ये भांडणं होणं काही नवं नाही. संपत्तीसाठी अनेक कुटुंबं एकमेकांच्या जीवावर उठतात. खासकरुन हे वाद भावा-बहिणींमध्ये असतात. पण संपत्तीसाठी एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर हात उचलणं याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण नेमकी अशीच घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी मुलाने आपल्याच आई-वडिलांनाच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत.  …

Read More »

अनंत अंबानींचं 14 कोटींचं घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; हा Viral Video पाहाच

Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचा प्री-वेडिंग सोहळा 3 दिवस चालला. या सोहळ्याला अनेक परदेशी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मनोरंजन, क्रिडा क्षेत्राबरोबरच कॉर्परेट क्षेत्रातील अनेक दिग्गज जगभरातून या सोहळ्यासाठी आले होते. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून …

Read More »