कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो रोज घेतला जाणारा हा पदार्थ

तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट वाचल्या असतील ज्यात चहाला पेय नाही तर भावना म्हणून संबोधले गेले असेल. कारण चहा हा आपल्या देशाचा आत्मा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही इतके आपल्या लोकांचे चहावर प्रेम आहे. हिवाळ्यात तर चहाला अजून जास्त डिमांड असते. चहाचे गरमागरम वैशिष्ट्य आणि फ्रेश करण्याचा गुणधर्म चहाला सगळ्यांपेक्षा वेगळे ठरवतो. हेच कारण आहे की काही चहाप्रेमी इतके वेडे असतात की भर उन्हात सुद्धा गरमागरम चहा प्यायला मागे पुढे पाहत नाहीत.

चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. याचे कारण केवळ त्याची चवच नाही तर त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. क्रोनिक डीजीज आणि सूज यासारख्या समस्यांपासून चहाच्या सेवनाने आराम मिळतो. मात्र याचे अति प्रमाणात सेवन केल्यास अनेक गंभीर परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते हे सुद्धा खरे आहे.

चहा अॅसिडीटी हार्टबनला ट्रिगर करते

एनसीबीआयच्या NCBI माहितीनुसार, चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे छातीत जळजळ अर्थात हार्टबर्नची समस्या आणि अॅसिडिटी निर्माण होऊ शकते. चहाच्या अम्लीय गुणधर्मामध्ये पोटात अॅसिडचे उत्पादन वाढवण्याची क्षमता असते. म्हणूनच चहा जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी पिऊ नये असा सल्ला दिला जातो.

हेही वाचा :  Covid 19: महाराष्ट्रातील करोनाची स्थिती चिंताजनक, तज्ज्ञांनी दिला इशारा; म्हणाले "जर..."

(वाचा :- वेटलॉस, पोट साफ न होणं, डायबिटीज, बॉडी डिटॉक्स, डायजेशनच्या समस्या होतील दूर, खा हा 1 पदार्थ)

चहामुळे वाढते बद्धकोष्ठता

जास्त चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. चहामध्ये थियोफिलिन असते, ज्यामुळे पचना दरम्यान डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे संडास कडक होऊन पोट नीट साफ होत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर चहाचे सेवन नियंत्रित प्रमाणातच केलेले उत्तम आहे.

(वाचा :- Sleeping Tips: रात्री 10 नंतर अजिबात करू नका ही 5 कामे, विळख्यात ओढतील हार्ट अटॅक व स्ट्रोकसारखे गंभीर आजार)

वाढू शकते डोकेदुखी

थोड्या प्रमाणात चहाचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. याउलट जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा पीत असाल तर त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी सुरु होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चहासारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- थंडीचा परिणाम समजून घसादुखीला घेऊ नका हलक्यात, असू शकतो Tonsil Cancer, पहिल्या पायरीत दिसतात ही 9 भयंकर लक्षणं)

वाढू शकतो कॅन्सरचा धोका

एका स्टडीनुसार, कमी चहा पिणाऱ्या लोकांपेक्षा रोज गरजेपेक्षा जास्त चहा पिणाऱ्या लोकांमध्ये स्तनाचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग, यकृताचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, पोटाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त आहे.

हेही वाचा :  Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

(वाचा :- भारतीय क्रिकेटपटूंची अग्नीपरीक्षा आहे BCCI ची Dexa Test, यामध्ये बाहेर पडणार खेळाडूंचे अनेक सिक्रेट्स, पण कसे?)

जास्त चहा प्यायल्याने येते झोप

चहाचे जास्त सेवन केल्याने तुमचे झोपेचे चक्र बिघडू शकते. त्यात नैसर्गिकरित्या कॅफीन असते, जे मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाची क्रिया अवरोधित करते जे मेंदूला झोपेचे संकेत देते. त्यामुळे झोप येत नाही.

(वाचा :- Ayurvedic Tips: ही लहान लहान 5 कामं करणा-या लोकांना स्पर्शही करत नाही कोणतेच गंभीर रोग, कायम राहतात दीर्घायुषी)

गरोदरपणात येऊ शकतो अडथळा

गरोदरपणात चहाचे अतिसेवन करणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविक, त्यात कॅफिन असते जे गर्भपाताची शक्यता वाढवते आणि मुलाचे वजन कमी करते. अशावेळी चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(वाचा :- Anal Fissure Treatment: पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधापेक्षाही भयंकर आहे फिशर, हे 5 उपाय आरामाचं गुपित)

किती प्रमाणात प्यावा चहा?

चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. हावर्ड युनिव्हर्सिटी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, दिवसातून 2-3 कप चहा प्यायल्याने अकाली मृत्यू, हृदयरोग, हार्ट स्ट्रोक आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासारखे फायदे मिळवू शकतात. तर जास्त प्रमाणात चहा घेतल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा :  फ्लोरल प्रिंटचा ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अवतार

(वाचा :- Covid 4th Wave : भारतात जानेवारीला येणार करोनाची चौथी लाट? AIIMS डॉक्टरांचा सल्ला, पुढील 40 दिवस करा हे एक काम)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …