​PAN Card ड्रायव्हिंग लायसन्ससह ‘हे’ महत्वाचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकता​ WhatsApp वर

WhatsApp: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक WhatsApp गेल्या काही वर्षांत व्हिडिओ कॉल, खरेदीसाठी अधिक वापरले जात आहे. तसेच, व्हॉट्सअॅप चॅटबॉट देखील एक महत्त्वाचे संपर्क साधन बनले आहे. अनेक सरकारी कागदपत्रे आहेत जी, WhatsApp वर डाउनलोड करता येतात. My Gov ही WhatsApp वरील चॅटबॉट-आधारित सेवा आहे, जी युजर्सना विविध महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी डिजिलॉकर वापरते. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि बरेच काही समाविष्ट आहे. व्हॉट्सअॅप युजर्स काही स्टेप्स फॉलो करून त्यांना व्हॉट्सअॅपवर डाउनलोड करू शकतात. यासाठी ही कागदपत्रे युजर्सच्या डिजिलॉकरमध्ये सेव्ह करणे आवश्यक आहे. येथे तुमच्या डिजिलॉकर खात्याच्या तपशीलांची पडताळणी आणि तुमचा WhatsApp क्रमांक तुमच्या आधार कार्डसह व्हेरिफाय करणे ही वन टाइम प्रोसेस आहे आहे . हे केल्यानंतर युजर्स सुरक्षा कोड टाकून त्यांचे दस्तऐवज डाउनलोड करू शकतात.

Marksheets

marksheets

Marksheets: CBSE गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे WhatsApp वर डाउनलोड करता येतात. व्हॉट्सअॅपवर डिजिलॉकर अ‍ॅक्सेस सेट केल्यानंतर, तुम्ही अ‍ॅपवरूनच मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र दोन्ही डाउनलोड करू शकता. WhatsApp वर My Gov चॅट विंडोमध्ये प्रवेश करण्यासाठी 9013151515 नंबर सेव्ह करा. MyGov चॅट विंडोवरील नंबरवर ‘हाय’ किंवा ‘डिजिलॉकर’ किंवा ‘नमस्ते’ पाठवा. येथे तुम्हाला स्वागत मेसेज मिळेल आणि तुम्हाला तुमच्या डिजिलॉकर खात्याचे तपशील सबमिट करावे लागतील. त्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर द्यावा लागेल आणि तुमच्या लिंक केलेल्या फोन नंबरवर पाठवलेला OTP टाकावा लागेल. OTP सबमिट केल्यानंतर तुम्ही WhatsApp वरून तुमची मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकाल.

हेही वाचा :  आता अनोळखी नंबर होणार Mute, WhatsApp घेऊन येतंय एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स

वाचा: Nokia: १७ हजारांचा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन ८४९ रुपयांत खरेदी करा, गिफ्ट देण्यासाठी आहे बेस्ट

PAN Card

pan-card

PAN Card: नमूद केल्याप्रमाणे, प्रत्येक वेळी तुम्ही My Gov चॅट विंडोमधून बाहेर पडाल आणि Re-Enter कराल, तेव्हा विंडो नवीन सारखी दिसेल आणि युजर्सना मुख्य मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी ‘हाय’ पाठवावे लागेल. युजर्स मुख्य मेनूमध्ये त्यांचे पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे सर्च करू शकतात. तसेच, मुख्य मेनूमध्ये, पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात.

सीबीएसई बारावीची मार्कशीट: एकदा तुम्ही My Gov चॅट विंडोमधून बाहेर पडल्यानंतर, लिंक केलेल्या डिजिलॉकर अकाउंटच्या मुख्य मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला पुन्हा ‘हाय’ पाठवावे लागेल. सीबीएसईचे विद्यार्थी व्हॉट्सअ‍ॅपवरील डिजीलॉकर अकाउंट ऍक्सेसमधून त्यांची १२ वीची मार्कशीट डाउनलोड करू शकतात.

वाचा: Google ने Play Store वरुन काढून टाकलेले ‘हे’ १३ धोकादायक Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

Driving License

driving-license

Driving Licence: देशात Driving Licence किती महत्वाचे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. पॅन कार्डप्रमाणेच, युजर्स त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये त्यांच्या मोबाईलवर थेट प्रवेश करू शकतात. My Gov चॅट विंडोमध्ये ‘हाय’ पाठवा आणि तुम्हाला एक स्वागत मेसेज मिळेल. Welcome Message मध्ये मुख्य मेनू पर्यायावर क्लिक करा आणि येथे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स ऍक्सेस करू शकाल. विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या हार्ड कॉपीशिवाय ड्रायव्हिंग / राईड करत असता तेव्हा हे वैशिष्ट्य तुमच्या उपयोगी पडू शकते.

हेही वाचा :  Breakup नंतर ही अभिनेत्री झालीये अधिक ग्लॅमरस आणि ब्युटीफूल, मोनोकिनीतील अदा करत आहेत घायाळ

वाचा : WhatsApp वरुन मागविली ३६० रुपयांची बिअर, बसला ४० हजारांचा फटका, पाहा डिटेल्स

​​Vehicle Registration Certificate

vehicle-registration-certificate

Vehicle Registration Certificate (RC) : वाहन नोंदणी प्रमाणपत्र किंवा आरसी हे दुसरे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जर तुम्ही तुमच्या RC ची हार्ड कॉपी जवळ बाळगत नसाल तर काळजी करू नका. तुम्हाला ती कॉपी थेट तुमच्या WhatsApp वर मिळेल. यासाठी तुम्हाला My Gov चॅटची मदत घ्यावी लागेल. My Gov चॅट विंडोमध्ये प्रवेश करा. मुख्य मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी ‘हाय’ पाठवा जिथे तुम्हाला आरसी मिळेल. तुमचे डिजिलॉकर खाते तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरशी लिंक असेल तरच हे काम करेल.

​​Insurance Policy Document

insurance-policy-document

Insurance Policy Document: WhatsApp द्वारे डिजिलॉकर, युजर्सना जीवन, वाहन, वैद्यकीय आणि इतर प्रकारच्या विमा पॉलिसींसाठी विमा पॉलिसी दस्तऐवजांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते. तुमचे WhatsApp उघडा आणि सूचीमधून My Gov चॅट निवडा. येथे ‘हाय’ टाइप करा आणि तुम्हाला चॅटबॉटकडून Welcome Messages सह दोन पर्याय मिळतील (जर तुमचे डिजिलॉकर खाते WhatsApp शी लिंक असेल). मुख्य मेनू म्हटल्या जाणार्‍या पर्यायावर क्लिक करा आणि येथे तुम्हाला तुमच्या विविध प्रकारच्या पॉलिसींसाठी विमा पॉलिसीची कागदपत्रे मिळतील.

हेही वाचा :  '...मगच माविआचं सरकार पाडलं', अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

वाचा: WhatsApp वरुन मागविली ३६० रुपयांची बिअर, बसला ४० हजारांचा फटका, पाहा डिटेल्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …