Bus – Car Accident : खासगी बस – कार अपघातात 10 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

Bus – Car Accident : कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात तनरसिंहपुरा भागात झाला. भरधाव आलेल्या कारने बसला समोरुन जोराची धडक दिली. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हा प्रकार बसमधील सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.

कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातावरुन कार चालक वेगात होता असे दिसते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार आहे.

कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या एका भीषण अपघातात म्हैसूर-कोलेगल मुख्य रस्त्यावरील वळणावर एका खासगी बसला कारने धडक दिल्याने 10 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. म्हैसूरहून पर्यटक माले महाडेश्वरा टेकडीकडे जात असताना दुपारी 2.15 च्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि नंतर बसला धडक दिली. 

हेही वाचा :  देवदर्शनाला निघालेली प्रवाशांनी कोंबून भरलेली बस ब्रीजवरुन थेट दरीत कोसळली; 10 ठार, 55 जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 10 जण बल्लारी जिल्ह्यातील असून त्यांनी म्हैसूरमधील काही पर्यटनस्थळांना भेट दिली होती. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे, परंतु इतर बहुतेक मध्यमवयीन आहेत. अपघाताची माहिती मिळताच टी नरसीपूर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये चार पुरुष, एक तरुण, तीन महिला आणि दोन मुले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातग्रस्तांची ओळख अद्याप पोलिसांना पटलेली नव्हती. बसमध्ये बसवण्यात आलेल्या डॅश कॅमेऱ्यात अपघात चित्रीत झाला.

म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुराजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे 10 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. मी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ट्विट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

तर पंतप्रधानमोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या दुर्घटनेने खूप दुःख झाले. मी कुटुंबीयांच्या दुखात सहभागी आहे. कुटुंबांसोबत आहेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …