बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback

महिमा चौधरीची लढाई

महिमा चौधरीची लढाई

Mahima Chaudhary Breast Cancer: ‘परदेस’ चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिला स्तनाचा कर्करोग होता. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर महिमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिमा म्हणताना दिसते की, कसे अनुपम खेर यांनी तिला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी यूएसमधून बोलावले होते. त्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला. या सर्वामध्ये Mahima Chaudhary ला ओळखणं देखील अवघड होऊन बसलं होते.

(वाचा :- फळं खाल्ल्यावर त्यांच्या साली फेकू नका, स्किन ग्लो करण्यासाठी करा भन्नाट वापर) ​

लिसा रेल

लिसा रेल

अभिनेत्री लिसा रेला 2009 मध्ये बोन मॅरो कॅन्सर झाला होता. तिला कॅन्सरमुक्त होण्यासाठी तीन वर्षे लागली. यानंतर अभिनेत्रीने आयुष्यात मागे वळून पाहिले नाही.तिला तिच्या पायावर नीट उभे राहताही येत नव्हते. मात्र, नंतर स्टेम सेल प्रत्यारोपणाच्या मदतीने लिसा रे कर्करोगमुक्त झाली. यावेळी तिचे गेलेले केस त्वचेवर आलेल्या खुणा या सर्वामुळे खचून न जाता ती खंबरपणे आयुष्य जगत आहे.

हेही वाचा :  हिवाळ्यात सहज आणि स्वस्तात मिळणाऱ्या या भाजीमुळे टाळता येतो Cancer, Diabetes आणि BP चा त्रास, मिळतील इतरही फायदे

ताहिरा कश्यपची लढाई

ताहिरा कश्यपची लढाई

आयुष्मान खुरानाचा पत्नी ताहिरा कश्यप हिला देखील २०१८ मध्ये कॅन्सरने ग्रस्त केले होते. तिला 2018 मध्ये तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. ती नेहमीच या आजाराशी लढा देण्याबद्दल उघडपणे बोलते. या काळात केस गेल्यावरही ती खूप उत्साहाने आणि धैर्याने या गोष्टींना समोरी जात होती.

सोनाली बेंद्रेलाचा लढा

सोनाली बेंद्रेलाचा लढा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जुलै २०१८ मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. सोनालीला मेटास्टॅटिक कर्करोगाचे metastatic cancer निदान झाले. अशा स्थितीत सोनालीचे केस गेल्याने तिच्या मनासिक सौंदर्यात काहीही बदल झाला नाही. सोनालीने मोठ्या ताकदीने कॅन्सरला सामोरी गेली.

(वाचा :- सतत नखं चावताय? हा घ्या रामबाण उपाय या 4 प्रकारे सवय कायमची दूर करा) ​

मनिषा कोईराला

मनिषा कोईराला

नेपाळच्या पंतप्रधानांची नात मनीषा कोईराला सुद्धा कॅन्सरने वेधले होते. मनीषा कोईराला ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. मनीषा कोईराला यांना त्यांच्या आयुष्यात नैराश्य, घटस्फोट आणि कर्करोग यांसारख्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. ती गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी ती दिर्घकाळ परदेशातच होती.

हेही वाचा :  रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक

(वाचा :- डोक्याचे केस गळतात? केसांचा झुपका हातामध्ये येत असेल तर जाणून घ्या टक्कल पडण्याची ही ५ लक्षणे)​

केमो थेरपीमध्ये नक्की काय होते

 केमो थेरपीमध्ये नक्की काय होते

कॅन्सरच्या तयार झालेल्या पेशींना नष्ट करण्यासाठी किंवा इतर भागांमध्ये कॅन्सर पसरु नये यासाठी केमोथेरपी केली जाते. कॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर, या रोगाचा अंश राहिलेल्या पेशींना दूर करण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो.

केमोथेरपीचे दुष्परिणाम काय?

केमोथेरपीचे दुष्परिणाम काय?

कॅन्सर संपूर्ण शरीररात पसरु नये म्हणून या पद्धातीचा वापर केला जातो. पण केमोथेरपीचे दुष्परिणाम आहेत. केमोथेरपीदरम्यान केसगळतीचा त्रास होतो. मात्र केमोथेरपीचे उपचार बंद झाल्यावर केस पुन्हा येतात.

कॅन्सरच्या उपचारपद्धातीमध्ये रक्तामध्ये ओषधे सोडली जातात. त्याचा परिणाम केसांवर होतो.

कॅन्सर संपूर्ण शरीररात पसरु नये म्हणून या पद्धातीचा वापर केला जातो. पण केमोथेरपीचे दुष्परिणाम आहेत. केमोथेरपीदरम्यान केसगळतीचा त्रास होतो. मात्र केमोथेरपीचे उपचार बंद झाल्यावर केस पुन्हा येतात.

तुम्हाला ही केस दान करायचे आहेत का?

तुम्हाला ही केस दान करायचे आहेत का?

तुम्हालाही केसचे दान करायचे असेल तर तुम्ही ‘अप्रोच हेल्पींग हँड्स फाऊंडेशन’ सोबत संपर्क साधू शकता. अप्रोच’ ही संस्था ‘मदत’ संस्थेशी जोडली गेलेली असून ही संस्था टाटा रूग्णालयाच्या संपर्कात आहे. यासाठी तुम्ही शिशिर जैन यांच्याशी 8275394886 या नंबरवर संपर्क साधू शकता.

हेही वाचा :  क्रिकेटर युझवेंद्र चहलची बायको देतेय टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर, सौंदर्याने जाल भारावून

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …