भाजप आमदाराची MSEB अधिकाऱ्याला धमकी, म्हणाले ‘आयकर विभागाची धाड टाकेन’

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. 

बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्यानं ते चांगलेच भडकलेत. भडकलेल्या लोणीकरांनी महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना फोन करून धमकावलं. तसंच शिवीगाळही केली. ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झालीय.

काय धमकी दिली आहे बबनराव लोणीकर यांनी
महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना फोन करुन धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप आहे. यात लोणीकर म्हणतायत… 

अरे XXXX आम्ही बील भरतो, मी दहा लाख रुपये बील भरलं आहे औरंगाबादचं. तुमच्यात हिंमत आहे तर झोपडपट्टीत जा, जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा, आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे दहा लाख भरले आहेत, मी या वर्षात एका मिनिटात मी तुला घरी पाठवेन, माज चढला का, आम्ही पैसे भरतो, 

जी छोटी लोकं आहेत ते लोकं तुम्हाला मटण तोडायच्या सत्तूरने तोडतील, नीट वागा, काचेची बांगडी आहे, घोडे लावू शकतो, सस्पेंड करु शकतो, तुम्हाला नीट करु शकतो, 

तुमच्या XXXX लोकांनी काढून नेलं आहे माझं मीटर, आयकर विभागाच्या धाडी टाकेन, काय प्रॉपर्टी घेतली, कुठे कुठे पैसे घेतले, आम्ही कुंडल्या ठेवल्यात तुमच्या आमच्या नादी लागू नका. 

हेही वाचा :  पाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024

आम्ही जिथे राहतो तिथे ५० टक्के आकडे आहेत, त्यांच्याकडे जाण्याची तुमची हिम्मत नाहीए. उर्जामंत्रीसुद्धा माझ्या जवळचे नातवाईक आहेत, उद्या एक कम्पेंट टाकली ना नोकरी जाईल

असं संभाषण या कथित ऑडिओ क्लिपमध्या आहे.

बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, हा मला बदनाम करण्याचा कट असून माझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय, माझं मीटर शाबूत आहे कुणीही कापले नाही, हा मला बदनाम करण्याचा कट असल्याचं लोणीकर यांचं म्हणणं आहे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …