भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित ठरला 9वा खेळाडू, यादीत पहिल्या स्थानावर कोण?

IND Vs SL:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जात आहे. हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास आहे. श्रीलंकाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीतील 400 सामना आहे. भारताकडून 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार रोहित 9वा खेळाडू ठरलाय. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अव्वल स्थानी आहेत. त्यांनी भारतासाठी सर्वाधिक 664 सामने खेळले आहेत. 

श्रीलंकाविरुद्ध दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील 46 वा सामना आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं भारताकडून 230 एकदिवसीय आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत. तसेच श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेला दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या कारकिर्दीतील 400 वा सामना आहे. 

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसरा कसोट सामना डे-नाईट खेळला जात आहे. दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. हा सामना अनिर्णित ठरल्यानंतरही भारताला मालिका विजयी म्हणून घोषीत केलं जाईल. 

हेही वाचा :  ICC World Cup, IND vs WI : भारतीय महिला वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यासाठी सज्ज, कधी, कुठे पाहाल सा

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडूलकर अव्वल स्थानी आहेत. त्यांनी भारतासाठी 664 सामने खेळले आहेत. त्यानंतर भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं भारतासाठी एकूण 538 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यानंतर राहुल द्रविड 509 सामने, विराट कोहली 458 सामने, मोहम्मद अजहरुद्दीन 433 सामने, अनिल कुंबळे 403 सामने, सौरव गांगुली 402 सामने तर, युवराज सिंहनं भारतासाठी 402 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. त्यानं भारतासाठी 400 क्रिकेट सामने खेळले आहेत. भारतासाठी 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणार रोहित शर्मा 9वा खेळाडू ठरलाय.  

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …