भारताने रशियाची स्वस्तात इंधनाची मोठी ऑफर स्वीकारली तर काय करणार? अमेरिकेने दिलं हे उत्तर

नवी दिल्ली : युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले. रशियाच्या तेलापासून (Russian Oil) वायूवरही बंदी घालण्यात आली. ज्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला (Russian Economy) फटका बसला. पण आता रशियाने आपली अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी भारताला कमी किमतीत इंधन तेल (Russian Fuel) देऊ अशी ऑफर दिली आहे. पण रशियाकडून तेल विकत घेतल्यास अमेरिकेच्या निर्बंधांनाही सामोरे जावे लागेल, अशी भीती भारताने व्यक्त केली होती, मात्र अमेरिकेने आता भूमिका स्पष्ट केली आहे. (US raction on Russia offer fuel in low price to india)

रशिया-युक्रेन युद्ध (Russia – ukraine War) सुरु झाल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत भारताची तटस्थ भूमिका समजून घेतली आहे. अमेरिकेच्या खासदारांनी म्हटले आहे की, भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीत रशियाबद्दलची त्यांची भूमिका समजण्यासारखी आहे.

युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हे रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, यासोबतच अमेरिकेने भारताला एक सल्लाही दिला आहे.

व्हाईट हाऊसचे (White House) प्रेस सेक्रेटरी जेन साकी (jen psaki) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘कोणत्याही देशाला आमचा संदेश आहे की आम्ही जे निर्बंध लादले आहेत त्यांचे पालन करा.

हेही वाचा :  Ukraine Russia War : कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात - यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelenskyy

या टीकेवर त्यांना विचारण्यात आले की, रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत, या बातमीबाबत अमेरिका भारताला काय संदेश देऊ इच्छित आहे?

याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मला नाही वाटत हे निर्बंधांचे उल्लंघन होईल. पण या काळात इतिहासाची पुस्तके लिहिली जातात तेव्हा कुठे उभे राहायचे याचाही विचार करा. रशियन नेतृत्वाला पाठिंबा देणे हे आक्रमणाचे समर्थन आहे. एक हल्ला जो स्पष्टपणे विनाशकारी असल्याचे सिद्ध होत आहे.

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला भारताने पाठिंबा दिलेला नाही. भारत सतत दोन्ही बाजूंना राजनैतिक चर्चेद्वारे मतभेद संपवण्यास सांगत आहे. भारताने आतापर्यंत संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधातील सर्व ठरावांवर मतदान करण्यापासून अंतर ठेवले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …