तिच्या जिद्दीपुढं सरकारही नमलं; हात नसतानाही महिलेला मिळालं ड्रायव्हिंग लायसन्स

प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करुन दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी असं स्वप्न होतं. आपलं हे स्वप्न तिने अखेर पूर्ण केलं आहे. 

केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आता ती चारचाकी वाहन चालवू शकते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे वाहतूक परवाना सोपवला. 

कोच्ची येथे ग्राफिक आर्ट डिझायनर म्हणून काम करणारी 32 वर्षीय जिलुमोल मॅरिएट थॉमस मागील काही वर्षांपासून चारचाकीचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं यासाठी प्रयत्न करत होती. यासाठी मागील बऱ्याच काळापासून ती वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेत होती. यादरम्यान कोच्चीमधील एक स्टार्ट-अप कंपनी वी इनोव्हेशनने तिच्या स्वप्नांना बळ दिलं. 

स्टार्ट-अपने विशेषतः मॅरियटच्या कारसाठी ऑपरेटिंग इंडिकेटर, वाइपर आणि हेडलॅम्पसाठी व्हॉइस कमांड-आधारित प्रणाली विकसित केली. या तंत्रज्ञानाच्या आणि प्रणालीच्या मदतीने मॅरियटला कार चालवण्यासाठी तिच्या हातांचा वापर करावा लागत नाही आणि ती काही निवडक वैशिष्ट्ये फक्त एका आवाजाने ऑपरेट करू शकणार आहे. केरळच्या अपंगत्वा आयोगानेही मॅरिएटला इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला.

हेही वाचा :  पोटं दुखत होतं म्हणून महिला डॉक्टरकडे गेले, तपासणी करताच मिळाली आनंदाची बातमी

कार नेमकी कशी चालवते?

हात नसतानाही मॅरिएट कार कशी चालवत असेल असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच. मॅरिएट कार चालवण्यासाठी पायांचा वापर करते. ती आपल्या पायांनीच स्टेअरिंग व्हिल सांभाळते आणि अत्यंत कुशलपणे कार चालवते. मॅरिएट सर्व कामं आपल्या पायांनीच करत असून, तिने स्वत:ला तसं तयार केलं आहे. ती आपल्या पायाने स्वाक्षरीही करते. 

मॅरिएटने ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी, ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण केली आहे, त्यानंतर अपंग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार परवाना जारी करण्यात आला आहे. मॅरिएटने मोटार वाहन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर लेखी आणि ‘एच’ चाचणी यशस्वीपणे उत्तीर्ण केली होती. अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 41 (2) अंतर्गत, सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अपंग व्यक्ती वाहनाच्या संरचनेत बदल न करता आवश्यक बदल करू शकते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …