बापरे ! विराटचा बेडवरील तो फोटो शेअर करत अनुष्का शर्माने दिल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

विराट कोहली (virat kohli) क्रिकेटच्या मैदानावर असला की अनेकांच्या मनात अशेचा किरण तयार होतो. विराट त्याच्या व्यावसायीक आयु्ष्यासोबतच विराटचे वैयक्तीक आयुष्यसुद्धा चर्चेत असते. विराट आणि अनुष्काला पाहिल्यावर हे बेस्ट कपल आहे हे आपसूकच तोंडातून येते. आज विराट त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर विराटचे काही सिकरेट फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांची लव्हस्टोरी देखील तितकीच सुंदर आहे. आयुष्यात आलेल्या अनेक चढ उतारांना या दोघांनी एकत्र सामोरे गेले. यांच्या या सुंदर लव्हस्टोरी मधुन आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया, @anushkasharma)

​काय आहे पोस्ट

विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्काने त्याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने आज तुझा वाढदिवस आहे त्यामुळे साहजिकच, मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्तम अॅन्गल असणारे आणि फोटो निवडले आहेत. तुझ्यावर प्रत्येक रुपात आणि स्वरुपात मी प्रेम करणार आहे असं म्हणतं तीने सोशल मीडियावर विराटचे काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा :  मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर 'इतके' असणार, अधिक जाणून घ्या

(वाचा :- ग्राऊंडवर केलं प्रपोज, चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही ‘या’ 6 भारतीय क्रिकेटपटूंची लव्हस्टोरी)

बेडवर झोपलेल्या विराटचा फोटो

या पोस्टमध्ये अनुष्काने बेडवर झोपलेल्या विराटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट विचित्र पोज देऊन झोपलेला पाहायला मिळत आहे. तर या सोबतच अनुष्काने इतर काही फोटो देखील शेअर केले आहेत.

नक्की आहे तरी काय पोस्टमध्ये

​कायम एकमेकांच्या सोबत

अनुष्का आणि विराट नेहमीच एकमेकांसोबत पाहायला मिळते. आयुष्यातील चढ उताराच्या क्षणांमध्ये ते दोघांही एकमेकांसोबत असतात. तुम्ही देखील या पॉवर कपलमधला हा गुण आत्मसात करु शकता. आणि तुमच्या जोडीदाराला खूश ठेवू शकता. आयुष्यात अनेक संकटे येतात पण अशात आपल्या जोडीदाराचा हात घट्ट पकडून ठेवायाचा असतो. ही गोष्ट तुम्ही देखील शिकू शकता.

(वाचा :- Genelia D’Souza ने सासूबाईंना दिल्या मराठीमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येक सूनेने या गोष्टी शिकायला हव्याच)

​समजून घेणे

आपल्या आयुष्यात आपल्याला कोणती समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हीच गोष्ट अनुष्का आणि विराट यांच्या बाबतीतसुद्धा झाली आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना ते दोघं धिराने सामोरे जाताना दिसतात. माणसाला आयुष्यात आपल्याला कोणतरी समजून घेणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा असे वाटत असते. जर तुमच्या जोडीदाराला तुम्ही समजू घेऊ शकत असाल तर या गोष्टीहून सुंदर कोणतीच गोष्ट नाही.

हेही वाचा :  भारतीय लष्कर जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? सीमा हैदरचे ATS चौकशीत मोठे खुलासे

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

अनुष्काचे प्रेम

​तुमच्या प्रियव्यक्तीला वेळ द्या

अनुष्का आणि विराट त्यांच्या कामातून वेळ काढून कुटुंबाला वेळ देतात. कितीही काम असलं तरी वामिका सोबत ते नेहमी वेळ घालावताना दिसतात. तुम्ही देखील तुमच्या बिझी आयुष्यातून तुमच्या परिवाराला वेळ द्या. कामच्या व्यापात आपण आपल्या व्यक्तीला वेळ देत नाही. त्यामुळे तुमची जवळच्या व्यक्तीला वेळ द्या. तो व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे ही गोष्टी त्याला सांगणे गरजेचं आहे.

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

​​अनुष्का शर्मा प्रत्येक पावलावर सोबत

विराटच्या चांगल्या आणि वाईट काळात अनुष्का शर्माला पाहिले गेले. सप्टेंबर २०२२ मध्ये, जेव्हा विराट कोहलीने ७१ वे शतक पूर्ण केले, तेव्हा अनुष्काने अभिमानास्पद भावना पोस्ट केली ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. विराटच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत अनुष्का शर्माने त्यावेळी लिहिले – ‘मी तुझ्यासोबत नेहमीच आणि प्रत्येक पावलावर असेन.’ अशी कॅप्शन शेअर केली होती.

हेही वाचा :  न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये चहलला खास रेकॉर्ड करण्याची संधी, दिग्गजांना टाकू शकतो मागे

(वाचा :- Chanakya Niti : तुमच्या या चुकांमुळे वैवाहिक जीवनाला लागेल ग्रहण, जाणून घ्या सुखी संसाराचे काही हटके नियम)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …