ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ठरला विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडचा 71 धावांनी केला पराभव

ICC Women WC Final: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकत इंग्लडला धूळ चारली आहे. अंतिम सामन्यात या संघाने इंग्लंड संघाचा एकतर्फी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 71 धावांनी जिंकला. यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली. तिने 138 चेंडूत 170 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. एलिसा ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू मिचेल स्टार्कची पत्नी आहे.

ऑस्ट्रेलियाने 356 धावांची मोठी धावसंख्या उभारली

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी रचली. रॅचेल हायनेस 68 धावा करून बाद झाली. त्याच्यानंतर सलामीवीर एलिसा हिली (170) हिनेही बेथ मुनी (62) सोबत 156 धावांची भागीदारी केली. 170 धावा करून एलिसाला अन्या श्रबसोलेने बाद केले. ती आऊट झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरबोर्डवर 316 धावा होत्या. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाला 350 च्या पुढे नेले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 356 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

हेही वाचा :  हार्दिकला टी20 संघाचा कर्णधार करण्याची रवी शास्त्री यांची मागणी, कपिल देव यांचं दिलं उदाहरण

ऑस्ट्रेलियाच्या 357 धावांच्या डोंगरासमोर इंग्लंड महिला संघ दडपणाखाली दिसला. अवघ्या 38 धावांत संघाने पहिले दोन विकेट गमावले. तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार हीदर नाइट (26) सोबत नॅट शिव्हर (148) हिने 48 धावांची भागीदारी केली. या धावसंख्येवर कर्णधार नाइट पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर आलेल्या नॅट शिव्हरने संघाची धुरा सांभाळली. मात्र तिला इंग्लड संघातून कोणीही साथ देऊ शकलं नाही. या सामन्यात नॅट शिव्हर 148 धावांवर नाबाद राहिली. संपूर्ण संघ 43.4 षटकांत 285 धावा करून सर्वबाद झाला. हा सामना इंग्लंडने 71 धावांनी गमावला.    

इतर महत्वाच्या बातम्या: 

CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या…
IPL 2022, GT vs DC : गिल-फर्गुसन विजयाचे शिल्पकार, दिल्लीचा 14 धावांनी पराभव

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …