औरंगजेब, टिपू सुल्तानचं उदात्तीकरण करणाऱ्यांना फडणवीसांचा जाहीर इशारा, म्हणाले “चौकशी झाल्यावर मी स्वत:…”

Devendra Fadnavis: अहमदनगरमधील (Ahmednagar) फकीरवाडा भागात संदल उरूस दरम्यान औरंगजेबाचे (Aurangzeb) फोटो घेऊन काही युवक नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दरम्यान, यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर इशाराच दिला आहे. नवी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

“कोल्हापुरात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मला या ठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहे हे माहिती आहे सांगतो. त्यानंतर काही तरुण औरंगजेब आणि टिपू सुल्तान यांचं उदात्तीकरण करतात आणि त्यानंतर तिथे एक प्रतिक्रिया येते. या विधानांचा आणि घटनेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात अचानकपणे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले? यांना कोण फूस लावत आहे? कोण अशा प्रकारचं उदात्तीकरण करण्यास सांगत आहे याचीही चौकशी आम्ही करत आहोत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

“आम्हाला काही गोष्टी समजत आहेत. पण सगळी चौकशी झाल्यानंतर मी त्यातील बाबी सांगेन. पण अचानकपणे अशाप्रकारे वेगेवगळ्या जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुल्तानचं उदात्तीकरण होणं हे काही सहज होत नाही. हा योगायोग नाही. त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे म्हणणं, त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे याच्या खोलात जावं लागेल,” असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

हेही वाचा :  Tech Layoffs: वर्षाच्या पहिल्या 15 दिवसांत 24 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या; IT क्षेत्र आघाडीवर

शरद पवारांनी धार्मिक तेढ निर्माण होण्याला सत्ताधारी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्याबद्दल विचारण्यात आलं असता फडणवीस म्हणाले की “मला आता स्पष्टपणे हे सगळे एका भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहेत. आता जर कुठे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर ती एका विशिष्ट समाजाचे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करत असल्याने होत आहे. आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथे हे चालणार नाही”. 

“यांचे काही नेते औरंगजेबाला देशभक्त ठरवण्यास निघाले आहेत. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे सर्वांना माहिती आहे. सर्वजण एकाच सुरात बोलतात आणि त्याला लगेच प्रतिसाद कसा मिळतो याचाही तपास करावा लागेल,” असंही फडणवीस म्हणाले. 

जनतेचे नेते संवाद करत असतात. आम्ही रोज जाऊन लोकांशी बोलतो, संवाद करतो. जे घरी बसून राजकारण करतात. ते पॉडकास्ट करतात. ते एकतर्फी संवाद करतात. फेसबुक लाईव्ह करतात. त्याचा परिणाम होत नाही. ते ऑनलाइन असतील आम्ही जमिनीवर आहोत असा टोला फडणवीसांनी लगावला. 

हेही वाचा :  पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, बस अर्धी कापली गेली तर ट्रकचा चेंदामेंदा; 4 ठार तर 22 जखमी

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …