पदवीधरांनो तयारीला लागा! IBPS अंतर्गत विविध बॅंकांमध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

IBPS PO Bharti 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.  आयबीपीएसमार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत. 

या बँकांमध्ये होणार भरती

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंका आयबीपीएस भरतीमध्ये सहभागी झाल्या आहेत. 

शिक्षण

प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. 

वयोमर्यादा

यासाठी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. 

हेही वाचा :  मॉडेल पूनम पांडेला केंद्र सरकारची मोठी भेट, सोपवणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी?

अर्ज शुल्क

जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 850 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून 175 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. 

निवड प्रक्रिया

प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत या 3 टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

याची पूर्व परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2023 तर मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 21 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ठाणे महापालिकेत नोकरीची संधी 

TMC Job 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये बंपर भरती सुरु असून उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून या भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड येणार आहे. ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी. पदव्युत्तर पदवी, डी.एन.बी. पदव्युत्तर पदवी. डिप्लोमा,FCPS, एम.बी.बी.एस पदवी आणि दंतचिकित्सा बी.डी.एस. पदवीसह एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे एकत्रित विद्यावेतन लागू राहणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत M.M.C/M.S.D.C चे वैध प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हे जोडले नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

हेही वाचा :  Google मध्ये नोकरी संकट! सुंदर पिचाई १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणारSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …