आई म्हणून अनुष्काने…विराटच्या डोळ्यात आले पाणी, म्हणाला ती माझी प्रेरणा आहे

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीचे जगभरात लाखो चाहते आहेत. दोघेही नेहमीच एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. कोणतीही मुलाखत असो अथवा सोशल मीडिया असो प्रेम व्यक्त करण्याची आणि नातं जपण्याची एकही संधी ही जोडी सोडत नाही. विराटने सध्या एक मुलाखत दिली असून ती खूपच व्हायरल होते आहे. यामध्ये आजवर आपण मिळवलेल्या यशामध्ये अनुष्काचा खूप मोठा वाटा असल्याचे त्याने सांगितले आहे. तर अनुष्का ही कायम माझी प्रेरणा राहिली आहे हे त्याने आवर्जून सांगितले.

नात्यात आदर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विराट – अनुष्का जोडीकडे पाहिल्यानंतर याचा दरवेळी प्रत्यय येतो. नवरा – बायको असो अथवा कोणतेही नाते असो आपल्यासाठी समोरची व्यक्ती नक्की काय करते आहे याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य – @anushkasharma Instagram)

​विराट – अनुष्का आदर्श जोडी​

​विराट - अनुष्का आदर्श जोडी​

विराट आणि अनुष्का नेहमीच एकमेकांसह दिसून येतात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर या दोघांनी एकमेकांना साथ दिली आहे. खासगी आयुष्य जपायला दोघांनाही आवडते. पण आता विराटने आपल्या आयुष्यात अनुष्काचे काय स्थान आहे याबाबत सांगितले आहे. ‘अनुष्काने माझ्यासाठी खूप त्याग केला असून त्याच त्यागातून मला कायम प्रेरणा मिळत आली आहे’ अशी भावना विराटने व्यक्त केली. या जोडीकडे नेहमीच आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते.

हेही वाचा :  एका घरात दोन वर्षांपासून मृतदेह खुर्चीत झुलत होता; कोणाला पत्ताच नाही

​नात्यात हवा आदर​

​नात्यात हवा आदर​

विराट ज्या पद्धतीने अनुष्काबाबत बोलतो त्यावेळी त्याच्या बोलण्यातून तिच्याविषयी प्रेमासह आदरही दिसून येतो. कोणत्याही नात्यात आदर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रेम आहे तर आदरही ठेवायलाच हवा.

(वाचा – हिंदू-मुस्लीम विभिन्न धर्म पण खऱ्या अर्थाने जिंकलं प्रेम, मिनी माथुर – कबीर खानच्या लग्नाला झाली २५ वर्ष)

जाणीव असावी

जाणीव असावी

आपला जोडीदार आपल्यासाठी किती प्रमाणात त्याग करतोय अथवा आपल्यासाठी काय गोष्टी करतोय याची जाणीव ही नात्यात असायला हवी. ही जाणीव असली की नातं जपणं अधिक सोपे होते. तसंच एकमेकांचा आदर केल्यामुळे भांडणं होत नाहीत.

(वाचा –पहिल्याच भेटीत शाहीदला आवडली मीरा राजपूत, १३ वर्षांनी लहान असूनही केले अरेंज मॅरेज)

​प्रेम व्यक्त करणे​

​प्रेम व्यक्त करणे​

एकमेकांबाबत नेहमी प्रेम व्यक्त करायला हवे. प्रेम आहे तर ते केवळ कृतीतून न दाखवता इतरांसमोरही व्यक्त करता यायला हवे. भावना व्यक्त केल्याने जोडीदाराला त्याची अधिक जाणीव होते आणि नातं जपायला मदत मिळते हे नेहमी लक्षात ठेवा.

(वाचा -Ex BF वरूणने दिलेल्या दागिन्यांचा वाद, दिव्या अग्रवालने भडकून दिले उत्तर, नात्यातून बाहेर पडल्यावर काय लक्षात ठेवाल)

हेही वाचा :  हार्दिक पांड्याला पर्याय, ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात, 'या' खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा

​विराट अनुष्काकडून प्रेरणा​

​विराट अनुष्काकडून प्रेरणा​

कितीही कामात असल्यानंतरही आपल्या जोडीदारासाठी वेळ काढणं हे नक्कीच विराट अनुष्काकडून शिकण्यासारखे आहे. काही वर्षांपूर्वी विराटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये फिल्डमधून विराटने अनुष्काला जेवलीस का अशी खूण केली होती. आपल्या जोडीदारावर असणारे प्रेम हे लहानशा कृतीतूनही व्यक्त करता येते. फक्त ते करण्याची इच्छा असायला हवी.

नातं जपताना खरंच या दोघांकडून लहान लहान गोष्टी शिकण्याची गरज आहे. विराट आणि अनुष्काच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून त्यांना कायम एकत्र पाहायलाच चाहत्यांना आवडेल.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …