Anti Valentine Week 2023 : व्हॅलेंटाइन वीक झाला आता अँटी व्हॅलेंटाईन वीक, तुम्हाला ‘या’ विषयी माहिती आहे का?

Anti Valentine Week 2023 : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस…7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाइन वीक साजरा केला. पण अशी अनेक जण आहेत, जे अविवाहि आहेत, तर काही जणांची ब्रेकअप झाली आहे. तर कोणाची प्रेमात फसवूक झाली आहे. त्यासाठी बुधवारपासून 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी यादरम्यान अँटी व्हॅलेंटाईन वीक मानला जातो. अँटी व्हॅलेंटाईन वीकमध्ये कुठले दिवस असतात त्याबद्दल जाणून घेऊयात. (Valentine day 2023 than now Anti Valentine Week 2023 full list Slap Day kick day Perfume Day Flirting Day Confession Day missing day breakup day 15 to 21 February in marathi)

स्लॅप डे (Slap Day 2023)

अँटी व्हॅलेंटाइन वीकचा पहिला दिवस आहे स्लॅप डे… जर तुमच्या पार्टनरने तुमची फसवणूक केली असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्ही स्लॅप डेच्या दिवशी तुमचे प्रेम संपवू शकता. थप्पड दिवसाचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन तुमच्या जोडीदाराला जाऊन जोरदार कानाखाली मारली पाहिजे. तर त्यांनी केल्या कृत्याचं निषेध व्यक्त करण्याचा हा दिवस…

हेही वाचा :  'सावरकर म्हणायचे, समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण...'; राज ठाकरेंचं 'मार्मिक' भाष्य

किक डे (kick day 2023)

16 फेब्रुवारी हा किक डे म्हणून साजरा केला जातो. याचा अर्थ असा की जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून वाईट नातेसंबंधातून जात असाल, दुःखातून जात असाल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी बाहेर पडा आणि नव्याने सुरुवात करा. जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला एखादी भेटवस्तू दिली असेल तर त्यापासून दूर राहा आणि पुढे जा.

परफ्यूम डे (Perfume Day)

अँटी व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस 17 फेब्रुवारीला परफ्यूम डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वतःसाठी एक छान सुगंधी परफ्यूम खरेदी करा आणि या सुगंधाने तुमच्या आयुष्यात नवीन सुगंध भरून दुःख विसरण्याचा प्रयत्न करा.

फ्लर्टिंग डे (Flirting Day)
 

18 फेब्रुवारी हा फ्लर्टिंग डे म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही सिंगल असाल किंवा तुमचं ब्रेकअप झालं असेल तर तुम्ही या दिवशी फ्लर्ट करू शकता. नवीन लोकांना भेटा मजा करा आणि आराम करा. 

कन्फेशन डे (Confession Day)

19 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस आहे. याला कन्फेशन डे म्हणतात. तुम्‍हाला तुमच्‍या मनाची कबुली एखाद्या खास व्‍यक्‍तीसमोर द्यायची नसेल किंवा तुमच्‍याकडून काही चूक झाली असेल, तर ही एक उत्तम संधी आहे. 

हेही वाचा :  IND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

मिसिंग डे (missing day 2023)

20 फेब्रुवारी हा मिसिंग डे म्हणून साजरा केला जातो, जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिस करत असाल, किंवा तुमचं ब्रेकअप झालं असेल आणि तुमचं प्रेम चुकत असेल, तर हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करू शकता. 

ब्रेकअप डे (breakup day)

 अँटी व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस ब्रेकअप डे आहे. जो 21 फेब्रुवारीला असेल, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि ते खूप विषारी झाले असेल, तुम्ही ते नाते जतन करून थकला आहात आणि आता तुम्ही त्या नात्यात आहात. जर तुम्हाला पुढे जायचे नसेल तर ब्रेकअपचा दिवस हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …