Anti Ageing Tips : वयाच्या 60ठी नंतरही दिसाल तरूण व चेह-यावर दिसणार नाही एकही सुरकुती, फक्त रोज फक्त 15 मिनिटे करा ‘हे’ 1 काम!

अभिनेत्रींची सुंदर आणि ग्लोइंग त्वचा पाहून आपल्याला सुद्धा वाटते की आपली त्वचा देखील अशीच सुंदर आणि ग्लोइंग व्हावी! पण कितीही प्रयत्न करूनही तशी त्वचा मिळत नाही. या मागचे कारण म्हणजे नक्की कोणते उपाय अशी त्वचा मिळवण्यासाठी वापरावेत याचे ज्ञान आपल्याला नसते. तुम्हाला सुद्धा अशा सुंदर अभिनेत्रींसारखी सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्हाला काही खास उपाय आणि खास टिप्स माहीत असायला हव्यात. आपण अनेकदा महागडे उपाय, क्रीम्स, ट्रीटमेंट यावर पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवतो.

पण त्यापेक्षा जर आपण योग्य उपायांवर भर दिला तर साहजिकच त्याचा फायदा मिळू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे योग्य उपाय कसे शोधायचे? कसे ओळखायचे? अहो आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खास उपाय जो तुम्ही घरच्या घरी जास्त पैसा आणि वेळ न घालवता करू शकता आणि तुम्हाला अभिनेत्रींसारखी सुंदर आणि ग्लोइंग त्वचा सुद्धा मिळेल. (फोटो साभार: माधुरी दीक्षित इंस्टाग्राम)

मेडिटेशन

हो मैत्रिणींनो हे आम्ही नाही तर खुद्द अनेक जाणकार आणि अभिनेत्री सुद्धा कबूल करतात की मेडिटेशन मुळे स्किनवर मोठा प्रभाव पडतो आणि खूप फायदा मिळतो. यामुळे पूर्ण दिवस छान जातो. चेहऱ्यावर आनंद राहतो. रोज केवळ 15 मिनिटे वेळ तुम्हाला द्यायचा आहे मग बघा तुमची त्वचा काही काळातच किती मस्त खुलेल. मेडिटेशन अशी गोष्ट आहे जी सुरुवातीला खूप बोरिंग वाटू शकते. याचा प्रभाव दिसण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे हा उपाय त्यांच्यासाठीच आहे जे खूप पेशन्स ठेवू शकतात. आता फुकटात जर ग्लो मिळवायचा असेल तर थोडी मेहनत केली पाहिजेच ना! अभिनेत्रीही रोज १५ ते २० मिनिटे हे नक्कीच करतात. त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी ध्यान अनेक प्रकारे कार्य करते. त्यामुळे तुमची त्वचा लवचिक राहण्यास मदत होते. त्याचवेळी, हे आपले सौंदर्य वाढवण्यासोबतच मूड देखील चांगला ठेवते.

हेही वाचा :  घनदाट केसांसाठी करा कोरफडचा असा वापर, नैसर्गिकरित्या होतील काळेभोर

(वाचा :- Sana Khan 24 Carat gold tea : जगातील सर्वाधिक उंचीवरील बुर्ज खलिफामध्ये सना खानने चाखला २४ कॅरेट Gold Tea चा स्वाद, हेच तर नाही तिच्या सौंदर्याचं रहस्य?)

चेहऱ्यावर दिसत नाही वृद्धपणा

जसजसे तुमचे वय वाढू लागते तसतसा स्किनमध्ये मोठा फरक दिसू लागतो. ही स्किन दर्शवते की तुम्ही म्हातारपणाकडे झुकत आहात. पण अशा अनेक स्त्रिया असतात ज्या वृद्धपणाकडे झुकून सुद्धा त्यांची स्किन खूप ताजीतवाणी आणि टवटवीत दिसते. तुम्हाला सुद्धा अशी सदाबहार स्किन मिळेल केवळ मेडिटेशनमूळे! स्किनमधील टिश्यू आणि सेल्स रिपेअर करण्याची प्रक्रिया मेडिटेशनमुळे फास्ट होते. मेडिटेशनमुळे स्किनला ऑक्सिजन सुद्धा मिळते. यामुळे स्किन कॉम्पलीकेशन नीट होते. एजिंग प्रोसेस स्लो करण्यासाठी मेडिटेशन बेस्ट उपाय आहे. यामुळे चेह-यावर सुरकुत्याही येत नाहीत. (फोटो साभार: istock)

(वाचा :- Summer Beauty Tips : उन्हाळ्यात वाढणारी पिंपल्स, डार्क सर्कल्स व ऑइली स्किनची समस्या होईल चुटकीसरशी दूर, करा ‘ही’ 5 कामे!)

स्ट्रेस लगेच दूर होतो

स्ट्रेसला हलक्यात घेणं सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण जेवढा तुम्हाला स्ट्रेस वा तणाव असेल तेवढी तुमची स्किन जास्त डॅमेज होऊ शकते. वेळीच जर हा स्ट्रेस रोखला नाही किंवा कमी केला गेला नाही तर अजून 50 आजारांना आमंत्रण मिळते. एवढेच नाही तर स्ट्रेस क्रोनिक लेव्हलला पोहोचला तर अनेक स्किन प्रॉब्लेम एकत्र सुरू होऊ शकतात. यामुळे त्वचा निस्तेज होते. स्किन ब्रेकआउट, पिंपल्स, एजिंगचे म्हणजेच म्हातारपणाचे साइन्स दिसू लागतात. या सर्वांवर मात करण्यासाठी मेडिटेशन तुमची मदत करू शकते. (फोटो साभार: शिल्पा शेट्टी इंस्टाग्राम)

हेही वाचा :  कांद्यांच्या सालींचा ‘या’ पद्धतीने वापर करून मिळवा लांबसडक, घनदाट व काळेभोर केस, कच-यात टाकण्याची करू नका चूक..!

(वाचा :- कांद्यांच्या सालींचा ‘या’ पद्धतीने वापर करून मिळवा लांबसडक, घनदाट व काळेभोर केस, कच-यात टाकण्याची करू नका चूक..!)

किती वेळ करावे मेडिटेशन

आता तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेलच की मेडिटेशनचे स्किनला होणारे फायदे तर कळले पण हे मेडिटेशन दिवसातून नेमके किती वेळ करावे? सर्वात प्रथम जाणून घ्या की मेडिटेशन ही एक शारीरिक क्रिया आहे आणि यासाठी वयाचे बंधन नाही. कोणीही व्यक्ती कधीही मेडिटेशन सुरू करू शकतो. आता तर लहान मुलांसाठी सुद्धा मेडिटेशन क्लासेस सुरू झाले आहेत. सुरुवातीला तुम्ही 10 मिनिटे मेडिटेशन करावे आणि मग हळूहळू हा वेळ वाढवावा. शक्य असल्यास 2 ते 3 सेशन मध्ये सुद्धा तुम्ही मेडिटेशन करू शकता. सुरूवात कमी वेळापासून करा जेणेकरून मन एकाग्र करण्यास अडथळा येऊ नये. (फोटो साभार: pexels)

(वाचा :- Herbal Oil For White Hair : ताबडतोब लावायला घ्या ‘हे’ घरगुती तेल, वयाच्या 50शी नंतरही येणार नाही केस पांढरे व पातळ होण्याची समस्या..!)

म्युझिक मेडिटेशन

पूर्वी मेडिटेशनचा अर्थ होता शांतपणे एका ठिकाणी बसून ध्यान लावणे होय. पण आता ही पध्दत आधुनिक युगानुसार बदलत चालली आहे. आता म्युझिक मेडिटेशन नावाची एक नवीन पद्धत विकसित झाली आहे जी अधिक जास्त प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. ज्या लोकांना एकाग्रतेमध्ये समस्या होते त्यांच्यासाठी म्युझिक मेडिटेशन हा एक बेस्ट उपाय आहे. यात लोकं आपल्या आवडीचे म्युझिक लावून छान धून ऐकत मेडिटेशन करतात यामुळे त्यांना लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते व ते जास्त वेळ मेडिटेशन करू शकतात. यामुळे संपूर्ण बॉडी आणि त्वचा रिलॅक्स होते. शिवाय यामुळे स्किन यंग दिसू लागते. (फोटो साभार: pexels)

हेही वाचा :  Blood Sugar कंट्रोल करतील हे गावटी रोपं, अगदी फुल, पानं आणि खोड सगळंच गुणकारी, खर्च अवघा २५ रुपये

(वाचा :- Celeb Hair Care: हेअरफॉलने अक्षरश: वैतागली होती ही अभिनेत्री, नव-याने सांगितलेले सीक्रेट उपाय वापरताच लांब व घनदाट झाले केस..!)

महत्त्वाची टीप

मेडिटेशनच्या माध्यमातून स्किन प्रॉब्लेम दूर करणे आणि एक हेल्दी व ग्लोइंग त्वचा मिळवणे हे शक्य जरी असले तरी हाच शेवटचा उपाय मानू नका किंवा यावरच विश्वास ठेवून बसू नका. तुमचे स्किन प्रोब्लेम जर मोठे असतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर अशावेळी एक्सपर्टचा सल्ला घेणे आणि त्यानुसार उपाचार सुरू करणे यातच शहाणपणा आहे. त्यामुळे हा लेख केवळ सामान्य माहिती म्हणून ग्राह्य धरा आणि हा उपाय ट्रायल बेसवर तुम्ही करून पाहू शकता. अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम!

(वाचा :- chapati For Skin : शिळ्या चपातीचा करा असा वापर, एका वापरात चेहरा आरशासारखा लख्ख चमकेल व सुरकुत्याही नाहीशा होतील..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …