आलिशान बंगल्यात राजेशाही मराठमोळ्या लुकमध्ये अंकिता लोखंडेची संक्रांत, नव-यासोबतच्या रोमँटिक पोजची तुफान चर्चा

अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी पाश्चिमात्य पोशाखात तर कधी भारतीय पोशाखात ती तिच्या सौंदर्याने नुसता धुमाकूळ घालते. विशेषत: अंकिता जेव्हाही तिचे साडीतील फोटो शेअर करते तेव्हा तिचा लूक पाहण्यासारखा असतो. तुम्हाला साडी नेसण्याची खूप आवड असेल तर तुम्ही अंकिताला आवर्जून फॉलो केले पाहिजे, कारण तिच्या विविध साडी लुकमधून तुम्हाला अनेक स्टाईल टिप्स आणि आयडीयाज मिळू शकतात. अंकिता ही स्वत: मराठी मुलगी असल्याने तिला लहानपणीपासूनच साडी नेसण्याची आवड आहे.

आता तर ती त्यात स्टाईल आणि फॅशनचा असा काही तडका मारते की एक परफेक्ट साडी मॉडेल म्हणूनच आपण तिच्याकडे पाहू शकतो. विवाहित स्त्रियांना तर तिचे लुक अगदीच आवडतात. साडी लुक मधील तिच्या फोटो खालील कमेंटमध्ये तिच्या साडीची केली जाणारी स्तुती तिचा प्रत्येक साडी लुक जबरदस्त असतो हेच दाखवून देते. नुकताच तिने मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि यादरम्यान केवळ तिच्याच नाही तर विकी जैनच्या लूकनेही लक्ष वेधून घेतले. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @lokhandeankita)

काळ्या साडीतील राजेशाही थाट

अंकिता लोखंडेने मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपरिक मराठी लूकमध्ये दिसत आहे. तिच्याकडे पाहताना मकर संक्रातीचा परफेक्ट मराठमोळा लुक असावा तर असा हेच वाटते आहेत. अंकिता स्वत: मराठी असल्याने तिला या सणाला कसे नटायचे हे बरोबर माहित आहे. आणि आपल्या यच स्कीलचा वापर करून तिने आपल्या या जबरदस्त साडी लुकने सगळ्यांचे मन जिंकले आहे.

हेही वाचा :  महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

(वाचा :- मनमोहकतेत मीरा राजपूतने नव-याच्या एक्स गर्लफ्रेंडलाही पाजलं पाणी, दोन मुलांच्या आईचं लोभस रूप बघून व्हाल वेडे)

बनारसी साडीचा जलवा

अंकिताने काळ्या रंगाची बनारसी साडी घातली होती ज्यात गोल्डन मोटिफ्स दिसत होते आणि हेमलाइनवर सोनेरी बॉर्डर होती. एकंदर या खास सणासाठी अंकिताने निवडलेली साडी अगदी हिट ठरली होती आणि सर्वांनाच तिची ही आवड पसंत पडली होती. तुम्ही देखील हळदी कुंकूसाठी साडी घेणार असाल तर अशा सुंदर बनारसी साडीचा नक्की विचार करा.

(वाचा :- भारतीय क्रिकेटर KL Rahul ची होणारी बायको पाहिली का? फिटिंग ड्रेसमधील ग्लॅमरने पाजलं बॉलीवूडच्या अप्सरांना पाणी)

ज्वेलरीने खेचून घेतले लक्ष

या साडीचा पदर हा लाल रंगाचा होता आणि तो खूपच जास्त सुंदर दिसत होता. त्याचवेळी, तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी आणि संक्रातीचे निमित्त म्हणून सुंदर हलव्याचे दागिने घातले होते. ज्यात तिळगुळापासून बनवलेला चोकर नेकलेस, लांब नेकलेस, मॅचिंग कानातले, हातफूल, नथ आणि ब्रेसलेटचा समावेश होता. या दागिन्यांनी तिच्या लुकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते आणि तिचा लुक अजून जास्त सुंदर दिसू लागला. महाराष्ट्रातील प्रत्येक नवरी लग्नानंतरची पहिली संक्रांत ही हलव्याचे दागिने घालून साजरी करते.

हेही वाचा :  केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

(वाचा :- भारताच्या संस्कृतीचं Miss Universe 2023ला जोरदार प्रदर्शन, सोन्याचे पंख लेऊन अमेरिकेत पोहचली सोनपरी दिविता राय)

केसांत माळले गुलाब सुरेख

तिने हातात हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. तिच्या केसांची स्टाईल स्लीक बनमध्ये होती आणि त्यावर तिने गुलाबाच्या फुलांचा बन जोडलेला होता. ‘मराठी मुलगी’च्या लूकमध्ये अंकिताने हेवी मेकअपसोबत तिचा लूक पूर्ण केला. एकंदर अंकिताचा हा लुक पाहणाऱ्या प्रत्येकाला क्षणात प्रेमात पडणारा ठरला. मराठी मुलगी असावी तर कशी? तर अंकितासारखी..!! असेच प्रत्येकजण म्हणताना दिसला. अंकिताच्या या लुकने बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटीजना सुद्धा इम्प्रेस केलं आणि त्यांना सुद्धा पारंपारिक मराठमोळ्या लुकची गोडी लावली.

(वाचा :- वयाच्या 50 शी मध्ये ब्रालेट टॉप घालून मलायकाचा लक्षवेधक लुक व्हायरल, अ‍ॅटिट्युड 18 वर्षांच्या तरूणीला लाजवणारा)

विकीचा हॅंडसम लुक

दुसरीकडे, विकी जैनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि हिरव्या रंगाचा वेस्टकोट परिधान केला होता आणि जो त्याला खूप जास्त खुलून दिसत होता. अंकिता आणि विकीची जोडी एवढी सुंदर दिसत होती की कपल्स असावे तर असे असेच प्रत्येक जण म्हणत होता. दोघांमधली क्युट केमिस्ट्री तर अजूनच प्रेमात पाडत होती.

(वाचा :- शाहरूखच्या लेकामुळे पाकिस्तानी मॉडेल चर्चेत, साडीपासून मिडी ड्रेसपर्यंत सर्वच लुकमध्ये जणू नुरजहॉंचीच प्रतिमा)

शिफॉन साडीतील मॉर्डन लुक

या फोटोत अंकिताने फिकट पिवळ्या रंगाची शिफॉन साडी परिधान केलेली दिसत आहे. अंकिताची ही साडी दिसायला पूर्णपणे साधी होती, ज्यावर फ्लोरल एम्ब्रॉइडरी मोटिफ्स कोरलेले होते. दुसरीकडे, पदरावर भारी भरतकाम दिसत होते, ज्यामध्ये स्वारोवस्कीसोबत पांढरे मोतीही दिसत होते. अंकिताने या साडीसोबत हाफ स्लीव्ह मॅचिंग क्रॉप ब्लाउज घातला होता जो लुक अजूनच आकर्षक बनवत होता.

हेही वाचा :  Raj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य

(वाचा :- तब्बल 57 करोडच्या आसपास कमाई असणा-या श्रद्धा कपूरचा हा आगळावेगळा अवतार पाहून व्हाल थक्कच, साधेपणाने जिंकली मनं)

मरून रंगाच्या साडीतील जलवा

या मरून रंगाच्या साडीत अंकिताने अक्षरश: खाऊन टाकलं. पफ स्लीव्जवाला डिझाइनर ब्लाऊज आणि एलिगंट नेकपेस घालून अंकिताने तिचा लुक कम्पलिट केला. इतकंच नाही तर नवरा विकी जैनसोबत रोमॅंटिक पोझ देत कपल गोल्स सेट करताना दिसून आली. केसांचा साधा अंबाडा, मिनीमल मेकअप, कपाळावर साडीला मॅचिंग मरून टिकली, गळाभरून हार, हातांवर मेहंदी आणि भांगात सिंदूर भरलेली अंकिता अगदी मनमोहक दिसत आहे.

(वाचा :- अक्षय कुमारचा लेक आरवसोबत दिसणारी ही सुंदरी कोण? यलो साडी व शिमरी वनपीसमध्ये जान्हवी व मलायकालाही देतीये टक्कर)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …