‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे? 

कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक अफलातून व्हिडीओ आणि एक अद्वितीय थरार सर्वांसमोर आणला आहे. जो पाहताना शब्दश: काळजाचा ठोका चुकतोय. 

बंजी जम्पिंग, झिप लायनिंग या आणि अशा अनेक साहसी खेळांविषयी तुम्ही ऐकलं असेल. पॅराग्लायडिंग, स्काय डायविंग हेसुद्धा त्यातलेच. पण, महिंद्रा यांनी एक असा साहसी खेळ सर्वांपुढे आणला आहे जो पाहताना भल्याभल्यांचे हातपाय गळून पडत आहेत. 

महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाच्या (Mahindra Group) अध्यक्षस्थानी असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही मंडळी ढगांच्याही वर एका पॅराशूटला बांधलेल्या ट्रॅम्पोलिनवर इतक्या फुटांवर निर्धास्तपणे उड्या मारताना दिसत आहेत. कथाचीही तमा न बाळगता उड्या मारणारी हीच मंडळी कालांतरानं त्या ट्रॅम्पोलिनवरून चक्क कोलांट्या उड्या घेत खाली उड्या मारत आहेत. 

हेही वाचा :  VIDEO: हा व्हिडीओ पाहून तुम्ही नूडल्स खायचं सोडून द्याल

ट्रॅम्पोलिनवर बसून तिथं सेल्फी घेत, या क्षणाचा आनंद घेत हा थरार अनुभवणाऱ्या मंडळींना पाहून आनंद महिंद्रा यांनी काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. ‘हे असं काहीतरी करणं माझ्या बकेट लिस्टमध्ये अजिबातच नाही, मला हे जमणार नाही. पण, एरा आरामखुर्चीत बसून रविवारचा आनंद देणारा हा व्हिीडीओ किती कमाल आहे ना…’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहित सुट्टीचा आनंद लुटत असल्याचंही अप्रत्यक्षपणे सांगितलं. 

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिशय झपाट्यानं व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 453.5K व्ह्यूज मिळाले असून, त्यावर अनेक लाईक्स आणि कमेंटही आल्या आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? पाहिला असेल तर, असा एखादा साहसी खेळ खेळण्याच्या विचारात तुम्ही आहात का? कमेंटमध्ये सांगा. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …