अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांनी काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी गायलेल्या एका देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांचे हे देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. ‘सारे जहाँ से अच्छा’ देशभक्तीपर गीत गाण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. या गाण्याला श्री सत्य कश्यप यांनी संगीत दिलं आहे.’ अमृता यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं आणि कमेंट्स देखील केल्या. 

पाहा व्हिडीओ: 


टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचे  ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सत्या कश्यप यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. The New Blood Bharateeyans या अल्बममधील हे गाणं आहे. या गाण्याला आतापर्यंत 12 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाईक केलं आहे. 

हेही वाचा :  Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिननं नोंदवला जबाब

अमृता फडणवीस यांची गाणी 

अमृता फडणवीस यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं आहे. तर कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांच्या ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत.

अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली. 

महत्वाच्या इतर बातम्या : Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …