आर. माधवननं ‘थ्री-इडियट्स’साठी दिलेल्या ऑडिशनचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

R. Madhavan: दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांचा थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) यांनी प्रमुख भूमिका साकारली. थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये आर. माधवननं फरहान कुरेशी ही भूमिका साकारुन अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील आर. माधवनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. या चित्रपटातील त्याला ‘अब्बा नहीं मानेंगे’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. या डायलॉगचे मीम्स देखील नेटकरी तयार करतात. आता या चित्रपटासाठी आर. माधवननं दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

विधू विनोद चोप्रा प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आर. माधवनच्या ऑडिशनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आर. माधवन काही डायलॉग्स म्हणताना दिसत आहे. यामधील काही डयलॉग हे चित्रपटात दाखवले आहेत. ‘फरहान कुरेशीची भूमिका ही आर. माधवनचीच होती, हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  Samantha Ruth Prabhu : समंथाची सोशल मीडिया पोस्ट, चाहते म्हणाले.... 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

आर. माधवनच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘त्याला ऑडिशन देण्याची गरज नाही’, अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर दुसऱ्या युझरनं ‘तो खूप छान अॅक्टिंग करत आहे’ अशी कमेंट केली.

पाहा व्हिडीओ


थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्या बरोबरच करिना कपूर, बोमन इराणी आणि मोना सिंह यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक राजकुमार यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

आर. माधवनचे चित्रपट

काही महिन्यांपूर्वी आर.माधवनचा धोका हा चित्रपट रिलीज झाला. तर त्याच्या ‘रॉकेट्री: नांबी इफेक्ट’ या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आर.माधवनच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. तनू वेड्स मनू, विक्रम वेधा या आर. माधवनच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

महत्वाच्या इतर बातम्या:

R. Madhavan : कोल्हापूरचा जावई अन् राजाराम कॉलेजमधील धम्माल; आर. माधवनने उलघडली अनेक गुपितंSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …