Almost Pyaar With DJ Mohabbat : अनुराग कश्यपसाठी विकी कौशल झाला डीजे!

Vicky Kaushal First Look : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विकी आता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) आगामी सिनेमात झळकणार आहे. ‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ (Almost Pyaar With DJ Mohabbat) असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमातील विकीचा लूक समोर आला असून या सिनेमात विकी ‘डीजे’च्या भूमिकेत दिसणार आहे. 

विकी कौशलने फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,”मला पहिला ब्रेक देणाऱ्या माणसावर माझं खूप प्रेम आहे. आता मी डीजेवाला झालो आहे”. विकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या सिनेमातील भूमिकेबद्दल विकी कौशल म्हणाला,”अनुराग सरांनी आजवर एक उत्तम मार्गदर्शक, मित्र म्हणून मला पाठिंबा दिलेला आहे. सिनेजगतातील ते माझे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला सिनेमासाठी विचारणा केली तेव्हा मी लगेच होकार दिला. हा माझ्या खास मित्राने बनवलेला खास सिनेमा आहे”. 


‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’  हा सिनेमा 3 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेात विकी कौशलसोबत अलायादेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर करण मेहता या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

हेही वाचा :  बॉबी देओल नाही, तर 'हे' खरं नाव; अभिनयासोबतच 'या' क्षेत्रातही केलंय काम

अनुराग कश्यपच्या ‘मसान’ या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशलने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण या सिनेमातील विकीच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं होतं. या सिनेमात विकी कौशलसोबत ऋचा चड्ढा आणि श्वेता त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकले होते. 

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजनविश्वात एन्ट्री!

बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यापूर्वी विकी कौशलने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. विकी दिग्दर्शक अनुराग कश्यपला आपला गुरू मानतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांने थिएटर करायला सुरुवात केली. विकी कौशल अनुराग कश्यपच्या ‘लव शव ते चिकन खुराना’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता.

संबंधित बातम्या

Pathan Worldwide Box office : जगभरात शाहरुखच्या ‘पठाण’चा बोलबाला; चार दिवसांत 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …