रेल्वेच्या या नव्या पाऊलामुळे सर्वसामान्यांची सोय होणार आहे.
ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तिकिटांची चिंता करावी लागणार नाही. तात्काळ तिकिटांसाठी रेल्वेने आता नवीन अॅप लाँच केले आहे. हे अॅप फक्त IRCTC वेबसाइटवर उपलब्ध असेल. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या घरात बसून आरामात क्षणार्धात तात्काळ तिकिटे बुक करू शकता.
अनेकवेळा असं घडतं की ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे कठीण झालं आहे. मग तात्काळ तिकीट मिळणंही सोपं नाही. मात्र रेल्वेच्या या नव्या पाऊलामुळे सर्वसामान्यांची सोय होणार आहे.
रेल्वेने लाँच केलेल्या या अॅपवर तुम्हाला ट्रेनसाठी तात्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांचीही माहिती मिळेल. याशिवाय, वेगवेगळे ट्रेन नंबर टाकून तुम्ही रिकाम्या जागा सहज शोधू शकता. यासोबतच संबंधित मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमधील उर्वरित तात्काळ तिकिटांची माहिती तुम्हाला तुमच्या घरच्या आरामात या अॅपवर मिळेल.
- हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
- या अॅपमध्ये तिकीट बुकिंगसाठी मास्टर लिस्ट देखील आहे ज्यामुळे तुमचा तिकीट बुकिंगसाठी वेळ वाया जाणार नाही
- या अॅपवर, प्रवासी त्यांच्या सेव्ह डेटाद्वारे सकाळी १० वाजल्यापासून तात्काळ तिकीट बुक करू शकतात.
- यानंतर, येथे तुम्ही या तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.
- लक्षात ठेवा तिकीट काढल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये असू शकते.
- या अॅपचे नाव कन्फर्म तिकीट आहे.
- तुम्ही हे अॅप IRCTC नेक्स्ट जनरेशन मोबाइल अॅपवरूनही डाउनलोड करू शकता.