डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही

Delhi Crime: : राजधानी दिल्ली घडलेल्या मुंबईतील तरुणीच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धा नावाच्या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच निर्घृण हत्या केली. तरुणीचा खून करुन तो थांबला नाही, त्याने तिचे ३५ तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले. श्रद्धा आणि आफताब अमीन पूनावाला यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला त्यामुळे असे झाले.असं कृत्य करताना त्याचे हात कसे थरथरले नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुलाने क्रूरतेचा कळस गाठला असं तुम्हाला वाटत असेत तर तसे नाही आहे. श्रद्धाचा आरोपी आफताब अमीन पूनावाला सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने श्रद्धाच्या मृत्यूबाबत अनेक खुलासेही केले आहेत. आफताबने सांगितले की, दोघांची भेट एका डेटिंग अ‍ॅपद्वारे झाली होती, त्यानंतर दोघेही कामासाठी मुंबईहून दिल्लीला गेले होते. दिल्लीत आल्यानंतर दोघेही केवळ लिव्ह-इनमध्ये राहू लागले नाहीत तर जेव्हा श्रद्धाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी असेही सांगितले आहे की, डेटिंग अ‍ॅपवर मैत्री केल्यानंतर आफताबने श्रद्धाला खूप आश्वासने दिली होती, त्यामुळे ती त्याच्या जाळ्यात अडकली.आफताबने श्रद्धाला जे केले ते ऐकून अंगावर काटाच येतो. या काही कहाण्या आहेत ज्या आपल्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

​आयपीएलचे कर्ज फेडण्यासाठी खून केला

असेच एक प्रकरण 2019 मध्ये समोर आले होते, जेव्हा दिल्लीतील द्वारकापुरी येथील माजी विंग कमांडर विनोद कुमार जैन यांची पत्नी मीनू जैन यांची हत्या करण्यात आली होती. एका बातमीनुसार, मीनू जैन एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दिनेश दीक्षितच्या प्रेमात पडली होती. दोघेही 6 महिने फक्त कॉलवरच बोलत होते, पण जेव्हा ते भेटले तेव्हा दिनेश दीक्षितने मीनूचा चेहरा उशीने दाबून खून केला. यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि दागिने असा 50 लाखांचा ऐवज लुटला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, असे आढळून आले की, दिनेश दीक्षित आयपीएल सामन्यांवर जुगार खेळल्यानंतर सट्टेबाजांच्या कर्जात बुडाला होता, त्यातून सुटका करण्यासाठी त्याने विंग कमांडरची पत्नी मीनू हिला अडकवले होते. ही गोष्टी सर्वांना थक्क करुन गेली. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​पैसे न मिळाल्याने खून

2018 मध्ये जयपूर येथील रहिवासी असलेल्या दुष्यंत शर्माची भेट प्रिया सेठ नावाच्या मुलीशी Tinder या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपवर झाली. यादरम्यान प्रियाने ती २५ कोटी रुपये उत्पन्न असलेल्या कंपनीची अध्यक्ष असल्याचे सांगितले होते. दुष्यंतनेही यावर विश्वास ठेवला होता. तो ज्या महिलेला भेटणार होता ती गुन्हेगार आहे याची साधी कल्पना देखील आली नाही. 2 मे रोजी प्रियाने दुष्यंत शर्माला तिच्या फ्लॅटवर भेटायला सांगितले, जिथे तिने आधी दुष्यंतला दारू पाजली आणि नंतर त्याच्याकडे पैसे मागितले. दुष्यंतने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच या तिघांनी त्याच्या वडिलांना खंडणीसाठी बोलावून दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने प्रियाने तिच्या साथीदारांसह दुष्यंतची हत्या केली. त्याने दुष्यंतच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते तुकडे NH48 दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर फेकून दिले. यावेळी समोरचा माणूस कसा आहे या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. (वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

हेही वाचा :  भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?

​कोरोनानंतर वाढला ट्रेंड

ही तीन प्रकरणे ऐकल्यानंतर, डेटिंग अॅप्सवर कोणाशीही संबंध सुरू करण्यापूर्वी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फोन आणि लॅपटॉपच्या मागे बसलेली व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून का? अशा परिस्थितीत जेव्हा या सर्व गोष्टी कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 2020 नंतर त्याचा ट्रेंड वेगाने वाढला. (वाचा :- डेक्सटर वेब सीरिज पाहून श्रद्धाचे ३५ तुकडे केले, बेवसिरीजचा रिलेशनशिपवर कसा होतो परिणाम? वाचा… )

​वैयक्तिक माहिती लगेच शेअर करू नका

कोणाला ओळखण्यासाठी वर्ष-6 महिने अजिबात पुरेसे नाहीत. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुमची वैयक्तिक माहिती त्याच्यासोबत शेअर करणे चुकीचे आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्हाला डेटरबद्दल जेवढे त्याने सांगितले आहे तेवढेच माहित आहे. अशा परिस्थितीत, त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे आपल्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकते. (वाचा :- “आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं,” रतन टाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

हेही वाचा :  "...तर कानाखाली आवाज काढेन", अजित पवार भर कार्यक्रमात संतापले, म्हणाले "फाजीलपणा सुरु आहे"

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …