लहानपणी या आजाराशी झुंजत होता अभिषेक, ९ व्या वर्षी दुर्लक्ष केले असते तर ठरला असता गंभीर

बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. व्यावसायिक आणि व्यक्तीगत आयुष्यात अभिषेकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने नेहमीच त्याची तुलना करण्यात आली आहे. पण व्यक्तीगत आयुष्यातही लहानपणापासून अभिषेकला अनेक त्रासाला सामोरे जावे लागले होते, त्यापैकी एक आजार जो अभिषेकला ९ व्या वर्षी कळला होता, डायेलेक्सिया. जाणून घ्या काय असतो नक्की हा आजार. (फोटो सौजन्य – @bachchan Instagram, Freepik.com)

​९ व्या वर्षी Dyslexia आजाराने ग्रस्त होता अभिषेक​

-dyslexia-

Dyslexia हा लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. ज्यामध्ये मुलांना अभ्यासात आवड निर्माण होत नाही. तसंच मुलांना काही शब्दांचे ज्ञान अवगत होत नाही अथवा शब्द वा अंक वाचणे वा बोलणे यामध्ये त्रास होतो. लहानपणी अभिषेकला या आजाराचा सामना करावा लागला होता. ‘तारे झमीन पर’ या चित्रपटात दर्शिलला दाखविण्यात आलेला हाच तो आजार. योग्य उपचार घेतल्यानंतर अभिषेक या आजारातून बाहेर पडला. पण अभिषेकची डायलॉग डिलिव्हरी पाहता त्याला असा आजार असू शकतो असं कोणालाच वाटणार नाही.

हेही वाचा :  Xiaomi चे दोन दमदार टॅब्लेट लॉन्च, Xiaomi Pad 6 आणि Xiaomi Pad 6 Pro बद्दल सर्व माहिती एका क्लिकवर

का सोडले होते शिक्षण​

का सोडले होते शिक्षण​

अभिषेकने मुंबईच्या जमनाबाई नर्सी स्कूल ऑफ बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले त्यानंतर दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण घेतले. मात्र या आजारामुळे अनेकदा त्याला शिक्षणात त्रासही झाला होता. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अभिषेकला वडिलांना झालेल्या लॉसमुळे परत यावं लागलं होतं.

(वाचा – World Cancer Day Quotes: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून प्रेरणा मिळवून देणारे कोट्स, जगण्याला देतील बळ)

​डिस्लेक्सिया म्हणजे काय?​

​डिस्लेक्सिया म्हणजे काय?​

डिस्लेक्सिया एक मानसिक आजार आहे. याचा आजाराचा संबंध हा आपल्या मेंदूशी असतो. काही मुलांना हा आजार जन्मजात असतो. याच्या ३ स्टेजेस असतात. पहिल्या स्टेजमध्ये मुलांना वाचायला, लिहायला जमत नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये गर्भातूनच मुलांच्या मेंदूचा विकास होत नाही. तर तिसऱ्या स्टेजमध्ये हा अत्यंत गंभीर आजार अथवा मेंदूला लागल्यामुळे मूल पीडित ठरू शकते.

(वाचा -बरगड्या दुखेपर्यंत खोकला येतोय का? करा हे घरगुती उपाय मिळेल त्वरीत आराम)

​काय आहेत डिस्लेक्सियाची लक्षणे​

​काय आहेत डिस्लेक्सियाची लक्षणे​
  • वाचणे, लिहिणे आणि बोलण्याचाही त्रास होणे
  • समजून घेणे आणि लक्षात ठेवण्यात त्रास
  • दुसरी भाषा समजून घेण्यास त्रास
  • कठीण शब्दांचे उच्चारण करताना त्रास होणे
हेही वाचा :  'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल

​Dyslexia पासून कसे वाचू शकता?​

dyslexia-

डिस्लेक्सिया एक अनुवंशिक आजारदेखील आहे. अशा परिस्थितीत उपचार करणे थोडे कठीण असते. मात्र अन्य परिस्थितीत डिस्लेक्सियावर उपचार करणे शक्य आहे. त्यासाठी तुम्ही प्राथमिक लक्षणं दिसल्यावर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासणी करून त्यावर योग्य उपाय करावे. दुर्लक्ष केल्यास हा आजार बळावणे धोक्याचे ठरू शकते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …