आजचं राशीभविष्य, रविवार, २० मार्च २०२२


मेष:-

जवळचा प्रवास कराल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ:-

मानसिक चंचलता जाणवेल. कमिशन मधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल.

मिथुन:-

वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

कर्क:-

मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.

सिंह:-

जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू  शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या:-

नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.  वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.

तूळ:-

अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत.

वृश्चिक-

अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

हेही वाचा :  viral trending video : बर्फीला हेअरकट... आता कसं वाटतंय?...गार गार वाटतंय..

धनू: –

आहाराकडे लक्ष ठेवा. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.

मकर:-

आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल.

कुंभ:-

कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.

मीन:-

झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …