सुपारीसारखा दिसणारा हा पदार्थ नसांमधील ब्लड शुगर -बीपीला पोहोचवेल ठिकाण्यावर, शरीर होईल एका झटक्यात निरोगी

Chestnut Benefits:आपल्याकडे अनेक आरोग्यदायी गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते. थंडीत शरीरासाठी अतिशय फायदेशीर अशा सुपरफूडची माहिती पोषण तज्ञांनी दिली आहे. या हिवाळ्यातील सुपरफूडचे नाव चेस्टनट आहे, जे चवीला हलके गोड असते.

चेस्टनटच्या झाडाला इंग्रजीत ओक ट्री म्हणतात आणि त्याच्या फळाला चेस्टनट म्हणतात. त्याचे फळ ड्रायफ्रूटसारखे खाल्ले जाते. चेस्टनट फळ हे सुपारीसारखेच असते. ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर असते. यासोबतच चेस्टनटमध्ये तुम्हाला अँटिऑक्सिडंट्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स इत्यादी पोषक तत्व मिळतात. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

चेस्टनट कसे आहे ते पहा

चेस्टनट कसे आहे ते पहा

​रक्तवाहिनीतील साखरेचे प्रमाण कमी करते

पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते, चेस्टनटमध्ये गॅलिक अ‍ॅसिड आणि इलाजिक अ‍ॅसिड असते. जे इंसुलिनचा वापर सुलभ करते आणि मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. चेस्टनटमध्ये असलेले फायबर देखील रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढू देत नाही. त्यामुळे मधुमेहींसाठी हा अतिशय गुणकारी पदार्थ आहे.

हेही वाचा :  कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

(वाचा – High Blood Sugar आणि Weight Loss पाठोपाठ ‘हा’ जीवघेणा कॅन्सर दार ठोठावतोय! या दोन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

​जळजळ होईल कमी

जर तुम्हाला सांध्याची जळजळ, फुफ्फुसाची जळजळ किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात जळजळ होत असेल तर तुम्ही चेस्टनटचे सेवन करू शकता. या ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, गॅलिक अॅसिड आणि इलाजिक अॅसिडसह अनेक पॉलीफेनॉल असतात असा अनेक अभ्यासांचा दावा आहे. जे फ्री-रॅडिकल्सला तटस्थ करून दीर्घकाळ जळजळ कमी करते. जळजळीवर रामबाण उपाय.

(वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी))

​पोट होईल साफ

जर तुमचे पोट साफ होत नसेल आणि बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर चेस्टनट जरूर घ्या. यामध्ये असलेले फायबर प्री-बायोटिक म्हणून काम करते, जे आतड्यातील निरोगी बॅक्टेरियांना निरोगी ठेवते. यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारते.

(वाचा – ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल))

​रक्तदाब नियंत्रणात राहतो

चेस्टनटमध्ये पोटॅशियम देखील असते. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यातील दोन ऍसिड, जेव्हा ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. तेव्हा हृदयाला रोगांपासून वाचवू शकतात.

हेही वाचा :  मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो, नव्वदीत पाचव्यांदा बोहल्यावर चढला, अजून लग्न करण्याची इच्छा

(वाचा -शरीरातलं रक्त, पाणी सुकवून टाकतात हे १५ पदार्थ, यामुळेच कमी वयात होतात हार्ट अटॅक-कॅन्सरसारखे जीवघेणे आजार)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …