877 newborns 41 mothers died during covid pandemic in meghalaya zws 70 | मेघालयात करोनाकाळात ४१ माता, ८७७ बालकांचा मृत्यू

करोनाकाळात मेघालयात गर्भवती माता आणि बाळांचे मृत्यू वाढल्याची दखल घेत आयोगाने राज्य सरकारकडे माहिती मागितली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

शिलाँग : मेघालयमध्ये करोना महासाथीच्या कालावधीत गर्भवतींनी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने ४१ माता आणि ८७७ नवजात शिशूंचा मृत्यू ओढवला, अशी माहिती मेघालय सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला दिली आहे. करोनाकाळात मेघालयात गर्भवती माता आणि बाळांचे मृत्यू वाढल्याची दखल घेत आयोगाने राज्य सरकारकडे माहिती मागितली होती.  करोना महासाथीव्यतिरिक्त सामाजिक-आर्थिक प्रश्न आणि लिंगभेद यामुळेही प्रसूतीदरम्यान मातांचे आणि शिशूंचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, असा दावा राज्य सरकारने केला आहे.   मेघालयातील अशा मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याची नोंद राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतल्यानंतर मेघालय सरकारने याबाबत कृती अहवाल आयोगाला सादर केला आहे. वैद्यकीय मदत न  मिळाल्याने यातील बहुसंख्य मृत्यू झाले आहेत. करोना चाचणी करण्यास नकार दिला जात होता, तसेच गर्भवती महिला करोना संसर्गाच्या भयाने रुग्णालयात दाखल होत नव्हत्या, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

हेही वाचा :  कर्मण्येवाधिकारस्ते...! 'या' राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवत गीतेचा सामावेश

Web Title: 877 newborns 41 mothers died during covid pandemic in meghalaya zws



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …