चरबी जळून वजनाचा काटा सर्रकन घसरेल खाली, हाडं होतील लोखंडासारखी टणक, करा हे 6 घरगुती उपाय

झटपट Weight Loss करण्याच्या नादात बरेच जण नाश्ता करतच नाहीत. तुम्ही सुद्धा हीच चूक करत असाल तर सर्वप्रथम एक लक्षात घ्या नाश्ता वगळल्याने वजन कमी होत नाही तर अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. असे म्हणतात की, जे लोक नाश्ता करतात त्यांचा बीएमआय कमी असतो आणि त्यांना Type 2 Diabetes आणि Heart Attack चा धोका कमी असतो. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण वजन कमी करण्याच्या बाबतीत Protein मोठी भूमिका बजावतात. पुरेशा प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने केवळ वजन कमीच होत नाही तर स्नायू मजबूत होण्यात आणि ताकद वाढवण्यासही मदत होते.

अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशनच्या मते, नाश्त्यासाठी हाय प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने स्नायूंची वाढ अर्थात मसल्स ग्रोथ होते, कॅलरीज बर्न होतात, हार्मोन्स बॅलन्स होतात आणि ग्लुकोज नियंत्रित करण्यास मदत होते. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्मा आपल्याला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहेत ज्या तुम्ही नाश्त्यात खाव्यात. तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

क्विनोआ कटलेट

क्विनोआ कटलेट

क्विनोआ कटलेट हा एक असा पदार्थ आहे जो तुम्ही नाश्त्याला बनवून झाला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळू शकते. हे बनवण्यासाठी पुढील साहित्य लागेल –

  1. 1 कप क्विनोआ
  2. 1/2 शिमला मिरची
  3. 1/4 कप कोबी
  4. 1 छोटा चमचा लाल तिखट पावडर
  5. 1 छोटा चमचा आमचूर पावडर
  6. 2 मोठे चमचे कोथिंबीर
  7. 1 मोठा कांदा
  8. 1/2 कप गाजर
  9. 3 चमचे बेसन
  10. 1 छोटा चमचा धने पावडर
  11. आवश्यकतेनुसार मीठ
  12. एक चमचा तेल
हेही वाचा :  या ५ आयुर्वेदिक भाज्यांमध्ये खच्चून भरलंय Protein,चिकन आणि अंड्याची गरजच भासणार नाही

(वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा, तुमच्या या चुकीमुळे झपाट्याने वाढतोय पोट व आतड्याचा कॅन्सर, ही 5 लक्षणं बेतू शकतात जीवावर)​

क्विनोआ कटलेट बनवण्याची कृती

क्विनोआ कटलेट बनवण्याची कृती
  1. सर्वप्रथम क्विनोआ 30 मिनिटे भिजत ठेवा.
  2. नंतर ते ब्लेंडर किंवा मिक्सरमध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. आवश्यक असल्यास 1-2 चमचे पाणी घाला.
  3. क्विनोआ पेस्ट एका भांड्यात काढा.
  4. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, कोबी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
  5. सोबतच बेसन, मीठ, धनेपूड, आमचूर पावडर आणि लाल तिखट पावडर घाला आणि सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
  6. नॉन-स्टिक पॅनमध्ये एक चमचा तेल घाला आणि गरम होऊ द्या.
  7. छोट्या छोट्या टिक्की बनवून तव्यावर ठेवा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  8. तयार आहेत आपले गरमागरम, स्वादिष्ट आणि हेल्दी क्विनआ कटलेट्स..!
    (वाचा :- पुरूषहो, या अवयवांत वेदना झाल्यास सावधान, लघवीच्या प्रेशरने रोज गाढ झोपेतून उठत असाल तर झालाय प्रोस्टेट कॅन्सर)​

बीन स्प्राऊट्स सॅलेड

बीन स्प्राऊट्स सॅलेड

क्विनोआ कटलेटप्रमाणे बीन स्प्राऊट सॅलेड देखील नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे बनवण्यासाठी पुढील साहित्या घ्या –

  1. 200 ग्रॅम बीन्स स्प्राऊट्स
  2. 2 टेबलस्पून गाजर (चिरलेले)
  3. 2 टेबलस्पून काकडी (चिरलेली)
  4. 2 टेबलस्पून कांद्याची पात (चिरलेली)
  5. 2 टेबलस्पून तेल
  6. 1 टेबलस्पून व्हिनेगर
  7. 1 टीस्पून लसूण (चिरलेली)
  8. 2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
हेही वाचा :  चिकन व मच्छी न आवडणा-यांसाठी मोठी खुशखबर, प्रोटीनचा खजिना आहेत हे 10 वेज पदार्थ

बनवण्याची सोपी पद्धत –

वरील सर्व साहित्य घ्या. या सर्व गोष्टी एका मोठ्या भांड्यात घेऊन नीट मिक्स करा. मग तयार झालं तुमचं हेल्दी बीन स्प्राऊट्स सॅलेड!

(वाचा :- Piles Remedy: पोट साफ न होणं आणि भयंकर मूळव्याध 100% बरा करतात या 15 भाज्या, खेचून बाहेर फेकतात आतड्यांतील घाण)​

कोकोनट आणि चिया सिड्स पुडिंग

कोकोनट आणि चिया सिड्स पुडिंग

पौष्टिक कोकोनट आणि चिया सिड पुडिंग बनवण्यासाठी खालील साहित्य घ्या –

  1. 1 किंवा 1/2 कप नारळाचे दूध
  2. 1/2 कप चिया किंवा सब्जा सिड्स
  3. 1 मोठा चमचा मॅपल सिरप
  4. 1 छोटा चमचा व्हॅनिला रस

बनवण्याची सोपी पद्धत –

वरील सर्व साहित्य घ्या. एका बाऊलमध्ये हे सर्व साहित्य एकत्र करा, चांगले मिक्स करा आणि रात्रभर झाकून ठेवा. सकाळी त्यावर ताज्या मोसंबीचे तुकडे, फळे किंवा सुका मेवा टाकून खा.

(वाचा :- Burn Belly Fat : या एका उपायाने मेणासारखी वितळते पोट, मांड्या आणि कंबरेवरची चरबी, लटकणारं पोट होतं कायमचं सपाट)​

ओट्स आणि पीनट बटर स्मुदी

ओट्स आणि पीनट बटर स्मुदी

ओट्स आणि पीनट बटर स्मुदी ही पौष्टिक डिश नात्यासाठी बनवण्याकरता खालील साहित्य घ्या –

  1. 1 कप बदामाचे दूध
  2. 1.4 कप ओट्स
  3. 1 छोटा चमचा पीनट बटर
  4. मुठभर केल भाजीची पाने
  5. 1 केळ
हेही वाचा :  Eknath Shinde:मोठा ट्विस्ट! शिदे गटाची ताकद आणखी वाढली...आता थेट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला

वरील साहित्य घ्या आणि हे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची स्मुदी बनवा.
(वाचा :- शास्त्रज्ञांचा सल्ला – जेवणाआधी खा फक्त इतके बदाम, रक्तातील साखर कधीच वाढणार नाही, कायमचा टळेल डायबिटीजचा धोका)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …