फोनवर बोलताना तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाहीये? असे करा माहित, ही ट्रिक येईल कामी

फोनवर बोलताना तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाहीये? असे करा माहित, ही ट्रिक येईल कामी


नवी दिल्ली: How To Know If Someone Is Recording Your Call: कॉल रेकॉर्डिंग अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे. हे लक्षात घेऊनच Google लने थर्ड पार्टी अॅप्स बंद केले आहेत. म्हणजेच कॉल रेकॉर्डिंगसाठी आता कोणीही Third Party Apps ची मदत घेऊ शकणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक Android फोन इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग वैशिष्ट्यासह येतात. पण, समोरच्या व्यक्तीने कॉल उचलताच तुमचा कॉल रेकॉर्ड होत असल्याचा मेसेज येतो. अनेक वेळा असंही होतं की समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असते आणि तुम्हाला कळतही नाही.

वाचा: या Jio, Airtel, BSNL, VI प्लान्समध्ये ३६५ दिवसांपर्यंतच्या व्हॅलिडिटीसह मिळतात सुपरहिट बेनिफिट्स

फोनवर बोलत असताना कॉल रेकॉर्ड होत असल्यास ते ओळखणे सोपे आहे. तुम्ही काही टिप्सच्या मदतीने माहित करू शकता. जाणून घ्या या भन्नाट सोपी ट्रिक्स.

नवीन फोनमध्ये घोषणा ऐकू येतात:

तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही. हे शोधणे इतके अवघड नाही. आजकाल नवीन स्मार्टफोन्समध्ये कॉल रेकॉर्ड होत असल्याची घोषणा ऐकू येते. परंतु, जुन्या फोनमध्ये घोषणा ऐकू येत नाही. असे झाल्यास ते दुसऱ्या मार्गाने माहित केले जाऊ शकते.

हेही वाचा :  Aadhaar Card: नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नसतानाही डाउनलोड करा आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

वाचा: नवीन हेडफोन्स खरेदी करायचेय ? boAt Rockerz 550 मिळताहेत १८०० रुपयांत

बीप आवाज:

तुम्ही कॉलवर असता तेव्हा कॉल काळजीपूर्वक ऐकल्यास तुम्हाला बीप ऐकू येत असल्यास, तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. कॉल रिसिव्ह केल्यावर बराच वेळ बीपचा आवाज आला तर समजा समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे.

वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकते:

तुमचा कॉल रेकॉर्ड होत असल्यास याचे पुढे जाऊन गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तुमची वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकते आणि ती व्यक्ती चुकीच्या हेतूने माहिती चार- चौघांसमोर उघड देखील करू शकते. म्हणून प्रत्येक वेळी कॉलवर बोलतांना तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाहीये याकडे लक्ष द्या.

वाचा: सुरू होतोय सेल, iPhone मिळणार २१ हजारात, इतर फोन्सवरही मोठा डिस्काउंट,पाहा डिटेल्स

Source link