विद्यार्थ्यासोबत मुख्यध्यापिकेचे अश्लील फोटोशूट; शाळेची सहल गेलेली असतानाच…

Karnataka Teacher And Student Viral Photoshoot: सरकारी शाळेतील 42 वर्षांच्या मुख्यध्यापिकेने विद्यार्थ्यांसोबतच अश्लील फोटोशूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक राज्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला या गावातील सरकारी शाळेतील हा प्रकार आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर शाळेने मुख्यधापिकेवर कारवाई करत तिचे निलंबन केले आहे.

शाळेची सहल गेली होती यावेळी शिक्षेकेने विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन केले. शिक्षेकेने विद्यार्थ्याला किस करतानाचे फोटोशूट केले. सोशल मीडियावर बुधवारी फोटो व्हायरल झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे फोटो पाहिल्यानंतर लगेचच शाळेत धाव घेत हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. विद्यार्थ्यांसोबत अश्लील फोटोशूट करणाऱ्या शिक्षेकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यानंतर वरिष्ठांनी शिक्षेकेच्या या वर्तवणुकीवरुन बीईओ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. 

शिक्षेकेविरोधात तक्रार दाखल होताच बीईओ उमादेवी यांनी शाळेतील शिक्षकांची, विद्यार्थ्यांची चौकशी केली. मात्र, त्याचवेळी कारवाईच्या भीतीने शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत काढलेले सर्व फोटो डिलीट केले होते. त्यामुळं हे फोटो मिळवण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर होते. चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे मुख्यधापिकेला निलंबीत करण्यात आले. 

बीईओ उमादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक आणि विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी होर्नाडू, धर्मस्थला, याना आणि अन्य ठिकाणी गेले होते. 22 ते 25 डिसेंबर पर्यंत ही सहल होती. त्याचवेळी हा प्रकार घडला आहे. मुख्यधापिकेनेच दोन विद्यार्थ्यासोबत अश्लील फोटोशूट केले. या फोटोत ती विद्यार्थ्यांना खेटून उभी असताना आणि गळ्यात हात घालून फोटो काढताना दिसत आहे. हे फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी लगेचच कारवाईची मागणी केली आहे. तसंच, या घटनेबाबत शाळेतील कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांनाही काहीच माहिती नव्हतं. 

हेही वाचा :  Assembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन

DDIP च्या माहितीनुसार, मुख्यधापिका 2005मध्ये प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. त्यानंतर 2015मध्ये तिला बढती मिळाली व ती माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून जॉइन झाली होती. दरम्यान या शिक्षकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हे फोटो डिलीट केले आहेत.  Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …